Rabbi Jowar Area
Rabbi Jowar AreaAgrowon

Rabbi Jowar Area : रब्बी ज्वारीचे क्षेत्र यंदा ८० हजार हेक्टरने घटले

पेरणी काळात अधिक पाऊस, मजूरटंचाईचा परिणाम

सूर्यकांत नेटके ः अॅग्रोवन वृत्तसेवा
नगर ः राज्यात गेल्या काही वर्षांपासून रब्बी ज्वारीचे क्षेत्र (Rabbi Jowar Area) वरचेवर घटत आहे. आतापर्यंत झालेल्या पेरणीनुसार राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ८० हजार हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे.

यंदा ज्वारी पेरणीच्या काळात अतिपावसामुळे वेळेत पेरणी झाली नाही. याशिवाय मजुरांची टंचाई ज्वारीचे क्षेत्र घटण्याला कारण ठरली आहे.

ज्वारीचा पट्टा असलेल्या नगर, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत ज्वारीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे.

Rabbi Jowar Area
Rabbi Jowar : रब्बी ज्वारीतील ओल कशी टीकवाल?

राज्यात रब्बीचे ५४ लाख २९ लाख १०१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत ५१ लाख ६७ हजार ६२३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

रब्बीचे क्षेत्र गतवर्षीपेक्षा यंदा वाढले आहे, मात्र ज्वारीचे क्षेत्र घटले आहे. राज्यात रब्बी ज्वारीचे सरासरी १७ लाख ३६ हजार २६८ हेक्टर क्षेत्र आहे.

यंदा १२ लाख २१ हजार ५०२ हेक्टर क्षेत्रावर ज्वारी पेरणी झाली आहे. आता ज्वारी हुरड्यात असल्याने नव्याने पेरणी होऊन क्षेत्र वाढीचा अंदाज नाही.

Rabbi Jowar Area
Rabi Season : रब्बी ज्वारीचे क्षेत्र खानदेशात वाढणार

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी २ लाख १० हजार हेक्टरवर, तर यंदा १ लाख ३९ हजार हेक्टरवर पेरणी झाली. उस्मानाबाद, बीड, परभणी, सातारा, जालना या जिल्ह्यांना ज्वारीचा पट्टा समजला जातो.

तेथेही क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. १२ वर्षांचा विचार केला, तर ३० लाख हेक्टरवर रब्बीत, तर १० लाख हेक्टरवर खरिपात ज्वारी घेतली जात होती.

एकट्या नगर जिल्ह्यात सुमारे सहा लाख हेक्टरपर्यंत ज्वारी पेरली जायची. मात्र आता क्षेत्रात होणारी घट लक्षणीय आहे.

Rabbi Jowar Area
औरंगाबाद जिल्ह्यात यंदा रब्बी कांद्याचे क्षेत्र तीन हजार हेक्टरने वाढले

बाजारात दर मिळेना
राज्यात सोलापूर, नगरमधील बाजार समित्यांत ज्वारीची मोठी आवक असते. मात्र ज्वारीला कधीही फारसा दर मिळाला नाही.

कोरडवाहू पीक म्हणून ज्वारीकडे पाहिले जात असले तरी मजुरी, खतांचे वाढते दर पाहता ज्वारीचे पीक परवडत नसल्याचेच शेतकऱ्यांचे मत आहे.

सध्या नगर येथील बाजार समितीत ज्वारीला ३ हजार ते ३ हजार ८०० व सरासरी ३४०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर आहे. गेल्या अनेक वर्षांचा विचार केला तर साडेचार हजारांच्या पुढे ज्वारीचा दर गेलाच नाही.

यंदाची जिल्हानिहाय ज्वारी पेरणी (कंसात सरासरी)
ठाणे : १२, पालघर : ४५०, नाशिक : २९०८ (४७९९), धुळे : ७०४४ (११०६४), नंदुरबार : ४६३६ (८०५१), जळगाव : ३१,८१९ (३९,४४६), नगर : १ लाख ३९ हजार ५२४ (२,६७,८३४)

पुणे : ६९,७२६ (१३४३३६) सोलापूर : २,३३,५२३ (३,१८,०५७) सातारा : १ लाख ८ हजार ५२७ (१३६५२६) सांगली : १ लाख २१ हजार ५२६ (१०८७०१), कोल्हापूर : ११ हजार ९३६ (११,७९३) औरंगाबाद : २८ हजार ६८७ (४६,३७७),

जालना : ६१ हजार ९२६ (८६,९३९) बीड : १ लाख १५ हजार ८३३ (१,६८,८२२) लातूर : २६२५० (३२,९४४), उस्मानाबाद : १ लाख २९ हजार १२३ (१,८१,४२७) नांदेड : २४,००९ (३२,६९९), परभणी ; ८० हजार १५५ (१,१३,०९०),

हिंगोली : ६८८२ (११,६९७), बुलडाणा : ७७१० (१२,७६१), अकोला : ५२६ (१००९), वाशीम : ३३० (१२००), अमरावती : १३४ (१०१), यवतमाळ : १४४२ (१५११), वर्धा : ६३३ (५७९) भंडारा : १८ (०) गोंदिया : ३२२ (४३६), चंद्रपूर : ४४४९ (२२८८), गडचिरोली : १४३३ (११९८), नागपूर : ० (६१२).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com