Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे ‘रब्बी’ अडचणीत

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला; मात्र आता गेल्या चार-पाच दिवसापासून थंडीचे प्रमाण कमी झाले असून दिवसभर ढगाळ वातावरण आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

विक्रमगड, जि. पालघर : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस (Rainfall) सरासरीपेक्षा जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान (farmer's Loss) झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम (Kharif Season) हातचा गेला; मात्र आता गेल्या चार-पाच दिवसापासून थंडीचे (Cold) प्रमाण कमी झाले असून दिवसभर ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आहे. या ढगाळ हवामानामुळे आता रब्बी हंगामही (Rabi Season) अडचणीत सापडला आहे. यामुळे भाजीपाला पिकाला फटक बसला असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Rabi Season
Rabi Sowing : यंदाच्या रब्बी हंगामात पेरण्यांची गती संथच

विक्रमगड तालुक्यात व परिसरात रब्बी पिकांच्या क्षेत्रात यंदा मोठी वाढ झाली आहे. या हंगामात शेतकरी मूग, हरभरा, वाल, उडिद, तूर या कडधान्यांबरोबरच काकडी, चवळी, वांगी, मिरची, गवार, टोमॅटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक आदी भाजीपाल पिक घेतात; पण गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याचे त्याचा परिणाम पिकांवर झाला. लागवड केलेले उडदाचे पीक, तुरीचे पीक हातून जायची वेळ आली आहे. यामुळे तीळ, वालाची वाढ खुंटणार आहे.

जमिनीला पुरेसा ओलावा असल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. आता काही दिवस जास्त थंडी तर काही दिवस ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील फळ पिकांची वाढ खुंटली आहे. याचा परिणाम तिळ, उडीद आणि वाल्याच्या वाढीवर होतांना दिसत आहे.

Rabi Season
Rabi Sowing : रब्बी ज्वारीच्या पेऱ्यात घट

विक्रमगड : रब्बी हंगामात शेतीचे काम करणाऱ्या ट्रॅक्टरमालकांनी ट्रॅक्टरचे भाडेतत्त्वावरील नांगरणी, वखरणी, जमीन सपाटीकरण इत्यादी विविध कामांचे दर वाढवले आहेत. यामुळे शेतीच्या खर्चात आता २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतितास ६०० रुपये मोजावे लागले होते. यंदा या कामासाठी ८०० ते १००० रुपये द्यावे लागत आहेत. शेती साहित्याच्या किंमतीबरोबर महागाईचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यातच खते, बियाणे, कीटकनाशके यांच्या दरात तिप्पट वाढ झाली आहे. परिणामी रब्बी हंगामातील लागवड खर्चातही मोठी वाढ झाली आहे.

झेंडूवरही परिणाम

ढगाळ वातावरणामुळे फळ आणि भाजीपाला लागवडीवर परिणाम झाला असताना त्याचा फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान झेंडू फुलांच्या उत्पादन होणार आहे. झेंडूच्या रोपांची वाढ खुंटण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

वारंवार बदलत्या वातावरणामुळे रब्बीतील फळ आणि भाजीपाला लागवडीवर परिणाम होणार आहे. तीळ, उडीद, तूर, हरभऱ्याच्या उत्पादनात घट होणार आहे.
ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, विक्रमगड
वारंवार वातावरण बदल होत असल्याने याचा परिणाम पिकांवर होताना दिसत आहे. थंडीचे कमी अधिक प्रमाण होत असल्याने कडधान्यांची रोपांची वाढ खुंटली आहे.
पुंडलिक सांबरे, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com