Rabi Season : रब्बीचा हंगाम यंदा महिनाभर उशिरा

राज्यात परतीचा पाऊस अधिक काळ सुरू असल्याने लवकर वापसा झाला नाही. त्यामुळे यंदा राज्यात रब्बीची पेरणीला सुमारे एक महिना उशीर झाला आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

नगर ः राज्यात परतीचा पाऊस (Returning Rain) अधिक काळ सुरू असल्याने लवकर वापसा झाला नाही. त्यामुळे यंदा राज्यात रब्बीची पेरणीला (Rabi Sowing) सुमारे एक महिना उशीर झाला आहे. रब्बीत सर्वाधिक ज्वारी, हरभरा, गव्हाचे क्षेत्र (Wheat Acreage) असते, साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून रब्बीची पेरणी (Rabi Crop Sowing) सुरू होऊन ऑक्टोबर महिनाअखेरीपर्यंत ७० टक्क्यांपर्यंत पेरणी होत असते. यंदा आतापर्यंत केवळ दहा ते पंधरा टक्के पेरणी झाली आहे. ज्वारीचा पेरणी (Jowar Sowing) कालावधी संपला आहे. अजूनही अनेक भागांत शेतात पाणी साचलेले असल्याने वापसा नाही.

राज्यात रब्बीचे ६० लाखांच्या जवळपास क्षेत्र आहे. गेल्या वर्षी ५७ लाख ८५ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणी झाली होती. यंदा सप्टेंबरपासून २२ ऑक्टोबरपर्यंत सलग पाऊस होता. त्याआधीही सातत्याने पाऊस सुरबच होता. त्यामुळे शेतातील पाणी कमीच झाले नाही. वाफसा होत नसल्याने यंदा सुमारे महिनाभर उशिराने रब्बीचा हंगाम सुरू झाला आहे.

Rabi Season
Rabi Sowing : देशातील रब्बी लागवडीला वेग

रब्बीत ज्वारीचे सर्वाधिक २० लाख हेक्टरच्या जवळपास सरासरी क्षेत्र आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ज्वारीचे क्षेत्र कमी होत आहे. ज्वारीच्या पेरणीचा दरवर्षीनुसार कालावधी संपला आहे. मात्र आतापर्यंत राज्यात केवळ पंचवीस टक्क्यापर्यंत पेरणी झाली आहे. गव्हाची साधारणपणे ९ लाख हेक्टरपर्यंत सरासरी क्षेत्र असून, १२ लाख हेक्टरपर्यंत पेरणी होत असते.

अजून पेरणी कालावधी बऱ्यापैकी शिल्लक असला, तरी गव्हाची पेरणी सुरुच झाली नाही. हरभऱ्याचे सरासरी साडेसतरा लाख हेक्टर क्षेत्र असून, दोन वर्षांपासून क्षेत्र वाढत आहे. गतवर्षी पावणेपंचवीस लाख हेक्टरवर पेरणी झाली होती.

Rabi Season
Rabi Sowing : रब्बी पेरणीत गव्हाची आघाडी

यंदा आतापर्यंत केवळ दहा टक्के पेरणी झालीय. अवधी असला तरी पेरणीचा वेग कमीच आहे. तेलबियांचे सरासरी ९० हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे. आतापर्यंत पाच टक्केही पेरणी झाली नाही. कडधान्याचे २३ लाख हेक्टवरपर्यंत पेरणी होत असते. यंदा आतापर्यंत १० टक्क्यापर्यंतही पेरणी झाली आहे. अनेक भागात अजूनही शेतात पाणी साचलेले असल्याने वापसा नाही. त्यामुळे आधीच एक महिना सरासरीच्या तुलनेत रब्बीला उशीर झाला असला, तरी लवकर पेरणी उरकण्याची शक्यता तरी दिसत नाही.

कांदा लागवड वाढणार

नगरसह मराठवाडा, विदर्भ, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, नाशिक जिल्ह्यांच्या काही भागांत उन्हाळी रब्बी गावरान कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या चार वर्षांचा विचार केला, तर कांद्याचे क्षेत्र दुपटीने वाढले. यंदा मात्र खरिपात कांदा वाया गेला, गतवर्षीच्या रब्बी उन्हाळ कांद्याला पुरेसा दर मिळाला नसल्याने अल्प दरात कांदा विकावा लागला. त्यात मोठा आर्थिक फटका बसला.

अनेक भागांत कापसाचे पीक काढून कांदा लागवड केली जाते. यंदा कापूसही उशिरा फुटला आहे. असे असले तरी कांदा लागवड वाढणार असल्याचा अंदाज आहे. मात्र कांदा लागवड उशिरा झाली, तर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान रब्बीत गावरान कांदा लागवड होत असते. यंदा खरिपात फारसा कांदा नाही. गतवर्षीचा गावरान कांदाही खराब होत असल्याने बऱ्यापैकी विक्री झालाय. आता कांद्याला मागणी वाढून दर चांगले वाढणार असल्याच अंदाज कांद्यातील जाणकार शेतकरी वैभव गोल्हार यांनी सांगितले.

रब्बीमधील साधारणपणे

पीक पेरणी कालावधी

ज्वारी ः १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर

हरभरा ः १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर

गहू ः डिसेंबरअखेर

करडई ः १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर

मका ः डिसेंबरअखेर

रब्बी कांदा ः नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com