Rabi season : पाच जिल्ह्यांत रब्बी पेरणीची गती मंदच

५२६९७ हेक्टरवरच झाली पेरणी लांबलेल्या पावसाचा परिणाम
 Rabi season
Rabi seasonAgrowon

लातूर : लांबलेल्या व अखेरच्या टप्प्यातील अति जोरदार पावसाने रब्बी पेरणी (Rabi sowing) लांबणीवर पाडली आहे. लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत आजवर सरासरी १३ लाख ६३ हजार ३९३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत केवळ ३.८६ टक्के म्हणजे ५२ हजार ६९७ हेक्टरवरच पेरणी झाली आहे.

यंदा कृषी विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांत यंदा रब्बी पेरणीची गती मंदच आहे. ऑक्टोबर संपूर्ण नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत आला, तरी अजूनही रब्बी पेरणी गतिमान झाल्याची स्थिती नाही. पुन्हा एकदा अतिवृष्टीने खरीप हातचा गेल्याने शेतकऱ्यांची सर्व मदार रब्बीवरच अवलंबून आहे.

विभागातील रब्बी पीक व पेरणी स्थिती

रब्बी ज्वारी ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३७१८५७ हेक्टर असून, आतापर्यंत ९८९४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी २.६६ टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे

गहू ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १५६५१९ हेक्टर असून, आतापर्यंत ८५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी सरासरी क्षेत्राच्या ०.५४ टक्का आहे. पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

 Rabi season
Kharif Crop Harvesting : खरीप पिकांच्या काढणी, मळणीची कामे वेगात

हरभरा ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७८६१२४ हेक्टर असून, आतापर्यंत ४००६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची सरासरी क्षेत्राशी टक्केवारी ५.१० टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

रब्बी मका ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १७९७ हेक्टर असून, आतापर्यंत २२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ०.२७ टक्का आहे. पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

करडई ः पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९५३१ हेक्टर.असून, आतापर्यंत १६३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून त्याची सरासरी क्षेत्राशी टक्केवारी ८.३४ टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

जिल्हा लातूर

सरासरी क्षेत्र २८०४३७

प्रत्यक्ष पेरणी १३१४५

टक्केवारी ४.६९

जिल्हा उस्मानाबाद

सरासरी क्षेत्र ४१११७२

प्रत्यक्ष पेरणी ३२३८

टक्केवारी ०.८९

जिल्हा नांदेड

सरासरी क्षेत्र २२४६३४

प्रत्यक्ष पेरणी ५३०७

टक्केवारी २.३६

जिल्हा परभणी

सरासरी क्षेत्र २७०७९५

प्रत्यक्ष पेरणी १९१५५

टक्केवारी ७.०७

जिल्हा हिंगोली

सरासरी क्षेत्र १७६८९३

प्रत्यक्ष पेरणी ११८५२

टक्केवारी ६.७०

एकूण विभाग

सरासरी क्षेत्र १३६३३९

प्रत्यक्ष पेरणी ५२६९७

टक्केवारी ३.८६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com