Rabi Sowing : वाशीम जिल्ह्यात रब्बी पेरणीला वेग

जिल्ह्यात रब्बी पिकांच्या लागवडीला जोर आलेला असून, आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या एकूण ८५ टक्के लागवड पूर्ण झाली.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon

वाशीम ः जिल्ह्यात रब्बी पिकांच्या (Rabi Season) लागवडीला जोर आलेला असून, आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या एकूण ८५ टक्के लागवड पूर्ण झाली. जिल्ह्यात ७६ हजार ७९० हेक्टरवर पेरणी आटोपली असून यंदा हरभऱ्यासह राजमा, मसूर, करडई, सूर्यफूल, मोहरी अशा पिकांचीही लागवड लक्ष वेधून घेत आहे.

Rabi Season
Farmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच

वाशीम जिल्हा खरिपात सोयाबीनचे हब म्हणून ओळख बनलेली आहे. तर रब्बीत हरभरा, गहू या पिकांसाठी ओळख तयार झालेली आहे. जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र ९० हेक्टरपर्यंत आहे. मागील काही वर्षात परतीचा पाऊस, प्रकल्पांमधील पाणी साठ्यामुळे रब्बीचे हे क्षेत्र एक लाख हेक्टरपेक्षा अधिक राहत आलेले आहे.

यंदाच्या वर्षातही हा टप्पा ओलांडल्या जाऊ शकतो. आतापर्यंत जिल्ह्यात हरभरा सरासरी क्षेत्र ६०८४३ हेक्टरच्या तुलनेत सुमारे ५५ हजार हेक्टरवर पेरल्या गेला आहे. हरभऱ्याची सुमारे ९० टक्के लागवड पुर्ण झाली. गव्हाची सुद्धा ८० टक्के लागवड होत आहे. गव्हाचे सरासरी क्षेत्र २५ हजार ८२९ हेक्टर असून आतापर्यंत २०३२० हेक्टरवर पेरणी झाली.

Rabi Season
Crop Insurance: पीकविम्याबाबत घेतली कृषीमंत्री सत्तार यांनी बैठक

राजमा, करडई, मसूरचीही लागवड

जिल्हयात या हंगामात शेतकरी इतर पिकांना प्राधान्य देऊ लागले आहेत. पारंपारिक गहू, हरभऱ्यासह राजमा, मसूर, मोहरी, करडईचीही लागवड झाल्याचे दिसून आले. प्रामुख्याने करडईची ६३८ हेक्टरवर पेरणी झाली. वास्तविक करडईचे ३९०हेक्टर सरासरी क्षेत्र असताना १७२ टक्के जास्त क्षेत्रावर पेरणी आटोपली. यावेळी राजमा पिकाचीही १९० हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली. मोहरी लागवडीकडेही शेतकऱ्यांचा कल असून २१० हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील रब्बी लागवड (हेक्टर)

पीक सरासरी क्षेत्र लागवड टक्केवारी

गहू २५८२९ २०३२० ७८.६७

हरभरा ६०८४३ ५४५५३ ८९.६६

राजमा १९०

मसूर १७८

करडई ३९० ६३८ १७२

मोहरी २१०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com