Rabi Sowing : खानदेशात रब्बीची पेरणी ७० टक्क्यांवर

खानदेशात यंदा झालेला ११० टक्के पाऊस, सिंचन प्रकल्पात असलेला पाणीसाठा या बळावर यंदाचा रब्बी हंगाम अधिक उत्पादन देणारा असेल, असे चित्र आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon

जळगाव : खानदेशात यंदा झालेला ११० टक्के पाऊस, सिंचन प्रकल्पात (Irrigation Project) असलेला पाणीसाठा या बळावर यंदाचा रब्बी हंगाम (Rabi Season)अधिक उत्पादन देणारा असेल, असे चित्र आहे. खरिपातील कापूसवगळता (Kharif Cotton) इतर पिके काढून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या (Rabi Sowing) पूर्ण होत आल्या आहेत. खानदेशातील पेरणी सुमारे ७० टक्के झाली आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : वाशीम जिल्ह्यात ११५ टक्के क्षेत्रात रब्बी लागवड

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५३ हजार ६८० हेक्टरवर (६४ टक्के) रब्बीची पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली. धुळ्यातही सुमारे ५० हजार हेक्टरवर तर नंदुरबारात सुमारे ३० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभरा, ज्वारीची मागणी पाहता ज्वारी, मका पिकांच्या अधिक हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत.

Rabi Sowing
Chana Sowing : परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हरभऱ्याचा पेरा वाढला

खरीप हंगामात दहा ते १५ टक्के कापसाचे नुकसान झाले होते. ते रब्बी हंगामात भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी जोमात सुरू केली आहे. जळगावात हरभऱ्याची सर्वाधिक ५१ हजार ४१९ हेक्टरवर पेरणी झाली. ज्वारी-दादरची २९ हजार ८६० हेक्टरवर (७६ टक्के), मका ४५ हजार ८५९ हेक्टर, इतर अन्नधान्य एक लाख ५२ हजार १४० हेक्टरवर झाली आहे.

कोरड्या वातावरणाची गरज

यंदा पाटाच्या पाण्याची तीन ते चार वेळा आर्वतने सोडण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यातच पावसाळी वातावरण सध्या आहे. यामुळे पिकांची हानी कुठेही झालेली नाही. परंतु कोरड्या वातावरणाची गरज आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com