Rabbi Season : रब्बीत गहू, तेलबिया पिकांची पेरणी वाढली

हरभरा पेरणीचा वेग मंदावला
Rabbi Season
Rabbi Season Agrowon

पुणेः देशातील रब्बी पेरणीचा (Rabbi Sowing) वेग जवळपास ३ टक्क्यांनी जास्त आहे. तसेच भात, गहू, आणि तेलबिया पिकांचीही लागवड जास्त आहे. तर हरभऱ्याची पेरणी (Chana Sowing) सध्या कमी झालेली दिसत आहे.

यंदा पोषक स्थिती असल्याने देशातील रब्बीची पेरणी वाढली आहे. यंदा परतीचा पाऊस चांगला झाला.

रब्बी हंगामातील पेरणीसाठी चांगला ओलावा होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांची काढणी झाल्यानंतर लगेच रब्बी पिकांच्या पेरणीला सुरुवात केली.

परिणामी यंदा रब्बी पेरणीचा वेग जास्त होता. देशात मागील आठवड्यापर्यंत रब्बी पेरणीचा वेग गेल्यावर्षीच्या तुलनेत २.८६ टक्क्यांनी जास्त होता.

६ जानेवारीपर्यंत देशात ६६५ लाख हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला. तर गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत ६४७ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती.

Rabbi Season
Rabbi Season : बाजारपेठ असल्यास राजमा ठरणार रब्बीत चांगला पर्याय

रब्बी हंगामातील भाताची लागवड २१ लाख हेक्टरवर पोचली. गेल्या हंगामात याच तारखेपर्यंत १६ लाख ४५ हजार हेक्टरवर भाताचं क्षेत्र होतं.

म्हणजेच यंदा भाताची लागवड गेल्यावर्षीपेक्षा साडेचार लाख हेक्टरने जास्त आहे. तर कडधान्य पिकाखालील क्षेत्र १५८ लाख हेक्टरवर पोचले.

गेल्या हंगामात कडधान्याचा या काळातील पेरा १५६ लाख हेक्टरवर होता.

Rabbi Season
Rabbi Season : मुबलक पाण्याचा रब्बी हंगामाला आधार

हरभऱ्याचा पेरा घटला


गेल्या हंगामात हरभरा पिकाला कमी दर मिळाला. त्यामुळे यंदा शेतकरी हरभऱ्याची लागवड कमी करतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

मात्र सुरुवातीच्या काळात हरभरा पेरणीचा वेग जास्त होता. मात्र मागील आठवड्यात हरभरा पेरणीचा वेग जवळपास अडीच टक्क्यांनी कमी झाला.

गेल्या हंगामात ६ जानेवारीपर्यंत १०९ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली होती. मात्र यंदा १०७ लाख ८२ हजार हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला.

उत्तर भारतातील शेतकरी यंदा हरभरा पिकाकडून मोहरी पिकाकडे वळाल्याचे दिसते.

तेलबिया पिकांची लागवड वाढली


सध्या रब्बी हंगामातील तेलबिया पिकांचा पेरा जास्त दिसत आहे. तेलबिया पिकांची पेरणी यंदा १०५ लाख ४९ हजार हेक्टरवर पोचली.

गेल्याहंगामात याच काळातील पेरणी ९७ लाख ६६ हजार हेक्टरवर झाली होती. यात मोहरीची लागवड ९५ लाख हेक्टरवर झाली आहे.

गेल्या हंगामात याच काळात ८८ लाख हेक्टर मोहरी पीक होते.

गव्हाचा पेरा २.२५ लाख हेक्टरने अधिक


गेल्या हंगामात गव्हाला चांगला दर मिळाला. त्यामुळे यंदा गव्हाची पेरणी वाढण्याचा अंदाज होता.

देशात ६ जानेवारीपर्यंत गेल्यावर्षीपेक्षा जवळपास २ लाख २८ हजार हेक्टरने पेरणी वाढली. देशात ३३२ लाख १६ हजार हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला.

तर गेल्या हंगामात या तारखेपर्यंत जवळपास ३२९ लाख ८८ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com