Rahibai Popere : अवैध दारू व्यवसायाविरुद्ध राहीबाई पोपेरे यांचा यल्गार

कोंभाळणे गावांत हल्लाबोल; विक्रेत्यांना ठणकावले
Rahibai Popere
Rahibai PopereAgrowon

नगर : कोंभाळणे हे आदिवासी भागातील गाव असूनही गावाने एक पद्मश्री आणि एक महाराष्ट्र केसरी घडवला. गाव महाराष्ट्राचे आणि देशाच्या पटलावर आले. अवैध दारू विक्रीमुळे गावाचे नाव खराब होण्याची वेळ येऊ लागली.

यामुळे आता गावातील दारू विक्री बंद करण्यासाठी कोंबड्या गावच्या रहिवासी पद्मश्री राहीबाई पोपेरे (Rahibai Popere ) यांच्यासह महिलांनी एल्गार पुकारला आणि दारू विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर हल्लाबोल केला. यापुढे गावात अवैध दारू विक्री खपवून घेणार नसल्याचा इशारा या महिलांनी या वेळी दिला.

कोंभाळणे हे अकोले तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील आणि आदिवासी भागातील गाव. देशी बियाण्याचे संवर्धन करणाऱ्या बीज माता राहीबाई पोपेरे यांच्यामुळे हे गाव चर्चेत आले. या वर्षीचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरही याच गावचा आहे.

पोपेरे यांची बीज बँक पाहण्यासाठी देशभरातून लोक येथे येतात. मात्र येथे होत असलेल्या दारू विक्रीमुळे आणि त्याकडे पोलिसांचे होत असलेले दुर्लक्ष यामुळे व्यसनाधीनतेची संख्या वाढली आणि त्याची नामुष्की गावकऱ्यांवर येत आहे.

Rahibai Popere
Rahibai Popere : बीजमाता राहीबाई पोपेरे यांचे भाषण रोखले

अनेक वेळा गावकरी, सामाजिक कार्यकर्ते, महिला एकत्र येऊनही अवैध दारू विक्री बंद झाली नाही. गावाने ठराव करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले.

गावची होणारी अधोगती पोपेरे आणि इतर स्त्रियांना सहन झाली नाही. पोपेरे यांच्या पुढाकाराने हळदी-कुंकवाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या सुमारे १५० ते २०० महिलांनी अवैध दारू व्यवसायाविरुद्ध एल्गार पुकारला. अवैध दारू बंद करण्यासाठी पोलिस गांभीर्याने घेतील का? याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अनेकदा समज देऊनही दारू विक्री थांबली नाही. उलट महिलांची खिल्ली उडवत राजरोजपणे सुरू होता. गावात अनेक विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, अभ्यासक, शास्त्रज्ञ गावरान बियांची बँक पाहण्यासाठी येतात.

दारूविक्री होऊ नये म्हणून सर्व प्रकारे प्रयत्न करून थकल्यानंतर शेवटचे पाऊल आम्ही उचलले.
- राहीबाई पोपेरे, बीज माता

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com