Rahul Gandhi News : राहुल गांधी यांचा मोदींवर हल्लाबोल

वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंवरचा जीएसटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात रविवारी (ता. ४) रामलीला मैदानावर मोदी सरकारविरोधात हल्लाबोल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
Rahul Gandhi
Rahul GandhiAgrowon

नवी दिल्ली : वाढती महागाई (Inflation), जीवनावश्यक वस्तूंवरचा जीएसटी (GST On Essential Goods) आणि बेरोजगारीच्या (Unemployment) मुद्द्यावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक (Congress Aggressive On Inflation) झाली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात रविवारी (ता. ४) रामलीला मैदानावर मोदी सरकारविरोधात हल्लाबोल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत राहुल यांनी मोदी सरकारवर (Narendra Modi Government) जोरदार निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi
Inflation : फळे-भाज्यांना महागाईचे प्रतीक समजणे चुकीचे

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडीने चौकशी केली होती. त्या चौकशीवरूनही त्यांनी नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत देशाला इतकी महागाई कधीच दिली नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. देशाला रोजगार देणाऱ्यांचा भाजपने कणा मोडला, असा आरोप त्यांनी केला.

Rahul Gandhi
Inflation : आपल्याकडे महागाई आहे, पण अमेरिकेऐवढी नाही!

केवळ दोन उद्योपतींनाच मोठे करण्यात येत आहे. मीडियादेखील सत्य दाखवत नाही, कारण मीडियाही त्या दोन उद्योगपतींच्या हातात असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मीडियाच्या आणि त्या दोन उद्योगपतींच्या समर्थनाशिवाय मोदी पंतप्रधान बनू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

‘...तर हा देश वाचणार नाही’

‘‘मला ५५ तास ईडीच्या कार्यालयात बसवले. मात्र मी मोदींना सांगू इच्छितो, मी तुम्हाला घाबरत नाही. तुम्ही मला ५०० तास जरी ईडीच्या कार्यालयात बसवले, तरी काही फरक पडत नाही. हा देश संविधानावर चालतो. जर आपण याविरोधात उभे राहिलो नाही तर हा देश वाचणार नाही,’’ असेही राहुल गांधी म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com