Assembly Speakar:विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर

राहुल नार्वेकर यांना १६४ सदस्यांनी मतदान केले. त्यांनी बहुमताचा आकडा गाठता आला. बहुजन विकास आघाडी, मनसेने राहुल नार्वेकरांना मतदान केले.
Rahul Narvekar
Rahul NarvekarAgrowon

विधानसभेच्या अध्यक्षपदी (Assembly Speaker) भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाली. विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राहुल नार्वेकर हे आत्तापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारल्याने सत्ताधाऱ्यांनी एक मोठी लढाई जिंकली आहे.

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक आवाजी मतदानाऐवजी सदस्यांच्या मागणीनुसार मत विभाजनाने घेण्यात आली. राहुल नार्वेकर यांना १६४ सदस्यांनी मतदान केले. त्यांनी बहुमताचा आकडा गाठता आला. बहुजन विकास आघाडी, मनसेने राहुल नार्वेकरांना मतदान केले.

Rahul Narvekar
Punjab Politics: पंजाबमध्ये या महिन्यापासून ३०० युनिट मोफत वीज

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील आमदार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या १०७ आमदारांनी शिवसेना उमेदवार राजन साळवी यांना मतदान केले. त्यामुळे अध्यक्षपदासाठी राहुल सुरेश नार्वेकर निवड झाल्याची घोषणा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केली. तसेच शिवसेनेच्या ज्या सदस्यांनी पक्षादेशाच्या विरोधात मत दिले त्यांची नावे नोंद करण्यात यावी, असा आदेश उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirval) यांनी दिला. शिवसेनेचे गटनेते या नात्याने अजय चौधरी यांनी उपाध्यक्षांना याबाबतचे पत्र दिले होते.

झिरवळ यांनी नार्वेकर यांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नार्वेकर यांना प्रथेप्रमाणे आसनाकडे नेले. नार्वेकर अध्यक्षपदाच्या खुर्चीत आसनस्थ झाले. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी नार्वेकर यांचे अभिनंदन केले.

राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदासाठी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रस्ताव दिला. त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिले. तर चेतन तुपे यांनी राजन साळवी यांच्या नावाचा प्रस्ताव दिला आहे. संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांनी त्याला अनुमनोदन दिले. दरम्यान, विरोधी पक्षांनी उभे राहून मोजणी करण्याला विरोध केला. त्यामुळे पोल घेतला गेला. प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्यांना उजव्या बाजूला बसवण्यात आले. विरोधात मतदान करणाऱ्या सदस्यांना डाव्या बाजूला बसवण्यात आले.

भगवे फेटे बांधून भाजपा - शिंदे गटातले आमदार विधानभवनात

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह त्यांचे समर्थक शिवसेना आमदार भगवा फेटा बांधून विधानभवनात दाखल झाले. भाजप आमदारांनीही भगवे फेटे बांधून एकत्र प्रवेश केला. त्यांनी तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

राहुल नार्वेकर कोण आहेत ?

राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)भाजपचे आमदार आहेत. नार्वेकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. नार्वेकर आधी शिवसेनेत होते, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादीत प्रवेश करताच जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी नार्वेकरांना मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचे तिकीट जाहीर केले. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. नार्वेकर यांची जून २०१६ मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवड झाली होती.२०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नार्वेकरांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. ते भाजपमध्ये सामील झाले.

भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांचे जावई आहेत. राहुल यांचे वडील सुरेश नार्वेकर कुलाबा भागातील नगरसेवक होते. त्याचे भाऊ मकरंद नार्वेकर प्रभाग क्रमांक 227 मधून दुसऱ्यांदा नगरसेवक आहेत.राहुल यांची वहिनी हर्षिता नार्वेकर या प्रभाग क्रमांक 226 मधून नगरसेविका आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com