
नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातील (Mahatma Phule Agriculture University) कृषी क्षेत्रामधील नावीन्यपूर्ण कौशल्य आत्मसात करण्याची विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ व ऑस्ट्रेलियातील मरडॉक विद्यापीठासोबत करार (Memorandum' agreement with Murdoch University) झाला आहे. मुंबई येथे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, ऑस्ट्रेलियाचे संस्कृती, कला व आंतरराष्ट्रीय शिक्षण विभागाचे मंत्री डेव्हिड टेम्पलमन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकत्याच झालेल्या बैठकीत संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख व आंतरराष्ट्रीय मरडॉक विद्यापीठाचे कुलपती श्री. केली स्मिथ यांनी सह्या केल्या आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील शिक्षणाची माहिती मिळावी, कृषी क्षेत्रामधील नावीन्यपूर्ण कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी हा करार केला आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थी येथे येऊन तर येथील विद्यार्थीही तेथे जाऊन अभ्यास करता येणार आहे. याशिवाय दोन्ही विद्यापीठांमध्ये कृषी शिक्षण व संशोधनाची देवाण-घेवाण होणार आहे. यामध्ये दोन्ही विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक व शास्त्रज्ञ यांना एकमेकांच्या विद्यापीठांतर्गत अभ्यास करता येईल.
सामंजस्य करारावर याप्रसंगी मरडॉक विद्यापीठाचे संचालक डॉ. राजीव वार्ष्णेय, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर व कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल उपस्थित होते. ऑस्ट्रेलियन चमूचे नेतृत्व पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रांताचे उपमुख्यमंत्री व पर्यटन, व्यापार आणि विज्ञानमंत्री श्री. रॉजर कुक यांच्यासह दोन्ही विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.