पनीरचे बनावट उत्पादन करणाऱ्यांवर छापा

नाशिक शहरातील अंबड येथील मधुर डेअरी ॲण्ड डेली नीड्स या कारखान्यावर धाड टाकत रिफाईन्ड तेलाचा वापर करून बनावट पद्धतीने पनीर तयार होत असल्याचे निदर्शनास आल्याने अप्पासाहेब हरी घुले यांच्याकडून २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Paneer
PaneerAgrowon

नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून अन्नसुरक्षेचा (Food Security) मुद्दा गंभीर वळणावर आहे. काही प्रक्रियायुक्त पदार्थ उत्पादक (Processed Product) ग्राहकांच्या जिवाशी खेळत असल्याचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (Food And Drug Department) बाब गंभीर घेतली असून नाशिकमध्ये बनावट पनीर (Fake Paneer) व भेसळयुक्त पदार्थ (Adulterate Product) बनवणाऱ्या दोन कारखान्यांवर अन्न धाड टाकून बारा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र हे थांबणार कधी असा सवाल ग्राहकांमधून उपस्थित होत आहे.

Paneer
Dairy Farming : शेतकरी नियोजन ः गाय, म्हैस पालन

नाशिक शहरातील अंबड येथील मधुर डेअरी ॲण्ड डेली नीड्स या कारखान्यावर धाड टाकत रिफाईन्ड तेलाचा वापर करून बनावट पद्धतीने पनीर तयार होत असल्याचे निदर्शनास आल्याने अप्पासाहेब हरी घुले यांच्याकडून २ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दुसरी कारवाई म्हसरूळ येथील आनंद डेअरी फार्म या कारखान्यावर करण्यात आली. येथील आनंद वर्मा नामक व्यक्तीस विचारपूस केली असता, विक्रीसाठी तयार केलेले पनीर हे बनावट दूध पावडर व खाद्यतेलाचा वापर करून उत्पादित केलेले असल्याचे समोर आले. त्या ठिकाणी दूध पावडर, रिफाइन पाम तेलाचा साठा उपलब्ध असल्याने येथील पनीरचा नमुना तसेच भेसळकारी पदार्थ यांची नमुने घेऊन त्यांचा एकूण ९ लाख ६७ हजार ३१५ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

Paneer
Dairy : एकीच्या बळावर यशस्वी झालेला दुग्धव्यवसाय

आता हे दोन्ही कारखाने सील केले असून, दोन्ही कारखान्यावर कारवाई अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांचे पथकाने सहायक आयुक्त यांच्या निर्देशानुसार नाशिक विभागाचे सहआयुक्त (अन्न) लोकरे यांच्या निर्देशानुसार सहआयुक्त ग. सु. परळीकर अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार केलेली आहे.

सणासुदीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन सतर्क

कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर नागरिक आनंदाने सण उत्सव साजरे करत आहेत. त्यामुळे खाद्यपदार्थांना मागणी वाढली असताना जिवाशी खेळ सुरू आहे. या सर्वांना आळा घालण्यासाठी नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन सतर्क झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाकडून धडक मोहीम हातात घेण्यात आली आहे. या माध्यमातून शहरातील भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्या तसेच खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या विरुद्ध कारवाई मोहीम सुरु केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com