Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम

राज्यात मागील आठवडाभरापासून अनेक भागांमध्ये पाऊस हजेरी लावतोय. आजही राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरी पडल्या.
  Rain Update
  Rain Update Agrowon

पुणेः राज्यात मागील आठवडाभरापासून अनेक भागांमध्ये पाऊस (Rain) हजेरी लावतोय. आजही राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरी पडल्या. तर बहुतांंशी भागांमध्ये हलक्या सरी पडल्या. हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.

  Rain Update
Rain Update : पाऊस चांगला, पण...

सध्या सुरु असलेल्या पावसानं जून महिन्यात लागवड केलेला कापूस आणि सोयाीबन पीक काढणीला आलंय. मात्र पावसानं राज्यभरात नुकसान वाढलंय. तुरही सध्या फुलोरा आणि शेंगा लागणीच्या अवस्थेत आहे. या पावसानं तुरीलाही फटका बसतोय. मराठवाडा, विदर्भ, खानदेशात पीक नकुसान जास्त आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत नुकसानीची दाहकता अधिक आहे. तर विदर्भातील अकोला, वाशीम, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, हळद, मका आणि फळपिकांचं पावसामुळं नुकसान वाढलंय.

  Rain Update
Cotton Rate: अमेरिकेतील कापूस उत्पादन घटणार? | Agrowon | ॲग्रोवन

राज्याच्या अनके भागांत सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत आहे. मात्र पावसामुळं अनेक ठिकाणी तयार सोयाबीन पाण्याखाली गेलंय. सतत पडणाऱ्या पावसानं शेंगा ओल्या झाल्या. मजूर लावून कापणी केलेल्या सोयाबीनच्या गंजीही वाहून गेल्या. पावसामुळं सोयाबीन देखील काळे होऊन त्यातील दाणे फुटत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांचा तोंडचा घास पावसानं हिरावलाय.

तर यंदा वेळेवर लागवड झालेल्या कापसाचीही वेचणी अनेक भागांत सुरु झाली. मात्र  पावसाने उमललेला कापूस पूर्ण भिजला. प्रतही घसरली असून, मजुरांकडून बेभाव वेचाईचा फटका शेतकऱ्यांना सध्या बसत आहे. तर वेचून आणलेला कापूस वाळू घालण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. दुसरीकडे सोयबीनही काढणीवर आले असून, दमदार पावसामुळे काढणीवर विपरीत परिणाम जाणवत आहे. एकंदरीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

  Rain Update
Lumpy Skin : जनावरे दगावल्यामुळे पशुपालकांना ८० हजारांची मदत

आजही राज्याच्या बहुतांशी भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली. अनेक ठिकाणी मुसळधार सरी पडल्या. तर बहुतांशी भागांत पावसाचा हलका पाऊस झाला. विदर्भातील भंडारा, गोंदीया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, वाशीम, गडचिरोली, बुलडाणा, अमवराती आणि अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार सरी पडल्या. तर बहुतांशी मंडळांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. भंडारा येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पाऊस पडला. तर मोहाडी येथे प्रत्येकी ९० मिलिमीटर पाऊस झाला. तसचं भंडारा जिल्ह्यातील तिरोडा येथे ९० मिलिमीटर, तुमसर येथे ८० तर नागपूर जिल्ह्यातील मौदा येथेही ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्रातही कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. तर धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात बुहतांशी ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये पावसाचा जोर अधिक होता.

तर हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत संपूर्ण विदर्भात विजांसह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड तसचं मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नगर आणि नाशिक जिल्ह्यात तुलळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com