Heavy Rain: मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस

रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील सर्व मंडळांमध्ये हलकी, मध्यम, दमदार ते जोरदार पावसाची (Heavy Rainfall) हजेरी लागली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील चार मंडळांत अतिवृष्टी झाली. १२ तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता.
Weather Updates
Weather UpdatesAgrowon

औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada) दोन दिवसांपासून पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. रविवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांत औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांतील सर्व मंडळांमध्ये हलकी, मध्यम, दमदार ते जोरदार पावसाची (Heavy Rainfall) हजेरी लागली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील चार मंडळांत अतिवृष्टी झाली. १२ तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. सोयगाव तालुक्यात सर्वाधिक सरासरी ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ६५ मंडळांत रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका, मध्यम, दमदार ते जोरदार पाऊस (Heavy Rainfall) झाला. जिल्ह्यातील १४ मंडळांत २० ते ४८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. सोयगाव तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. या तालुक्यातील तीनही मंडळ मिळून सरासरी ६२.४ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.

सोयगाव तालुक्यातील सोयगाव मंडळात ७० मिलिमीटर, सावलदबारा मंडळात ७० मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. कन्नडमधील दोन मंडळासह सिल्लोड तालुक्यात सर्व मंडळात मध्यम ते दमदार पाऊस झाला. औरंगाबाद, पैठण, गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, फुलंब्री व कन्नड तालुक्यांतील बहुतांश मंडळांत हलका तर काही मंडळात मध्यम पाऊस झाला.

जालना (Jalana) जिल्ह्यातील सर्व ४९ मंडळांत पावसाने हजेरी लावली. परतूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. या तालुक्यातील परतूर मंडळात ९९.३ मिलिमीटर तर वाटूर मंडळात ७७.३ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्ह्यातील २० मंडळात २० ते ५१ मिलिमीटर दरम्यान पाऊस नोंदल्या गेला. मंठा तालुक्यात मध्यम ते दमदार, घनसावंगी, बदनापूर तालुक्यात हलका ते मध्यम, जालना, भोकरदन व जाफराबाद तालुक्यात मध्यम ते दमदार तर अंबड तालुक्यात हलक्या पावसाची नोंद झाली.

Weather Updates
Kharif sowing :तेलबिया लागवड क्षेत्रात २० टक्क्यांची घट

लातूर (Latur) जिल्ह्यातील सर्व ६० मंडळांत हलका, मध्यम ते दमदार पाऊस झाला. ३३ मंडळांत २० ते ४४ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. देवणी, शिरूर अनंतमाळ, जळकोट, चाकूर, उदगीर, अहमदपूर तालुक्यांत मध्यम ते दमदार पाऊस झाला. जळकोट व देवणी तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व ४२ मंडळांत मध्यम ते दमदार पावसाची हजेरी लागली. परंडा तुळजापूर तालुक्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता.

पाचही जिल्ह्यांतील परांडा, तुळजापूर, जळकोट, शिरूर अनंतमाळ, देवणी, चाकूर, उदगीर, अहमदपूर, परतूर, भोकरदन, सोयगाव व सिल्लोड तालुक्यांत २५ ते ६२ मिलिमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील सर्वच ६३ मंडळांत पावसाची हजेरी लागली.

Weather Updates
Ekanath Shinde : आषाढी एकादशीनंतर मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करू: शिंदे

जिल्ह्यात सर्व दूर झालेला पाऊस बहुतांश मंडळात तुरळक ते हलक्या स्वरूपाचा तर काही मंडळात मध्यम स्वरूपाचा झाला. दरम्यान रविवारी दुपारपर्यंत औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर या पाचही जिल्ह्यांतील अनेक भागात कुठे रिमझिम, कुठे संततधार, कुठे सरीवर सरी पाऊस पडणे सुरू होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com