Rain Update : खानदेशात सर्वत्र पाऊस

खानदेशात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सर्वत्र हा पाऊस झाला आहे. परंतु यामुळे पूर्वहंगामी कापूस पिकाचे अंशतः नुकसान झाले आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

जळगाव ः खानदेशात मागील दोन दिवसांपासून पाऊस (Rain Update) सुरू आहे. सर्वत्र हा पाऊस झाला आहे. परंतु यामुळे पूर्वहंगामी कापूस पिकाचे अंशतः नुकसान (Cotton Crop Damage) झाले आहे. ज्वारी, मका, कांदेबाग केळी, सोयाबीन या पिकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

Rain Update
Rain Update : विदर्भाला मुसळधारेने झोडपले

ज्वारी, मका आदी पिके नासवली होती. सोयाबीनच्या शेंगांत दाणे पक्व होण्याची स्थिती होती. परंतु सुमारे १७ दिवस पावसाचा खंड होता. या काळात अपवाद वगळता पाऊस झालेला नव्हता. यातच पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी अनेक भागात सुरू झाली होती. हलक्या, मुरमाड, मध्यम जमिनीत २८ मे ते १ ३ जून या काळात लागवड केलेल्या पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी सुरू झाली होती.

Rain Update
Rain Update : तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

यातच शनिवारी (ता.१०) अनेक भागात पाऊस झाला. तसेच रविवारी (ता.११) देखील अनेक भागात पाऊस झाला. रविवारी सकाळपासून काही भागात पाऊस झाला. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात अनेक भागात पावसाने झोडपले. सुसाट वाराही पावसासोबत होता. यामुळे पाचोरा, जामनेर, एरंडोल, पाचोरा आदी भागात कापूस पीक लोळले आहे. तसेच मकाही काही अंशी आडवा झाला आहे. नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नवापूर भागातही काही भागात रविवारी जोरदार पाऊस झाला.

धुळ्यातील साक्री, शिरपूर भागातही पावसाने हजेरी लावली. जळगावमधील जळगाव, धरणगाव, अमळनेर, पारोळा आदी भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. कुठेही अतिवृष्टी झालेली नाही. परंतु वाफसा स्थिती नाहीशी झाली आहे. मका, सोयाबीन या पिकांसाठी पाऊस दिलासादायी आहे. परंतु वेचणीवर आलेल्या कापूस पिकातील बोंडे लाल व काळी पडण्याची भीती आहे. कापूस पीक अनेक भागात जमिनीवर लोळल्याने बोंडे उमलण्यात अडचणी येतील. तसेच बोंडे खराब होण्याचीदेखील भीती आहे.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील गिरणा धरणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे नदीत प्रवाही पाणी वाढले आहे. तापी, पांझरा नदीदेखील प्रवाही आहे. परंतु पाचोरा, चाळीसगाव, एरंडोल भागातील धरणांमधील जलसाठा हवा तसा वाढलेला नाही. तसेच जामनेरातील वाघूर धरणातील जलसाठादेखील फारसा वाढलेला नाही. धरणात ६५ टक्के एवढा जलसाठा आहे.

विविध तालुक्यांतील पाऊस (मिलीमीटरमध्ये)

जळगाव ः २१, चोपडा १६, धरणगाव, १८, पाचोरा २३, यावल १४, रावेर १४. धुळे ः १७, साक्री २३. नंदुरबार ः १६, नवापूर २१, शहादा २२.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com