Rain : पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

गेल्या जून महिन्यात कमीअधिक पाऊस पडल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोर धरला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : गेल्या जून महिन्यात कमीअधिक पाऊस (Rain Update) पडल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने जोर (Rain Force) धरला आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच (Heavy Rainfall) वाढला आहे. मंगळवारी (ता. ५) सकाळी आठ वाजेपर्यंत वेल्ह्यात १५५.३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे (Department Of Agriculture) झाली आहे.

पावसाचा जूनचा एक महिना लोटला तरीही पुणे जिल्ह्यात अद्याप दमदार हजेरी लावलेली नव्हती. यामुळे जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या १७६.२ मिलिमीटरपैकी अवघा ८३.१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली होती. सरासरी ४७.२ टक्के पाऊस पडला. या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास १९ मंडळात ५० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस पडला असून धरणात अद्याप पुरेसा पाणीसाठा वाढलेला नव्हता. गेल्या आठवड्यापासून पुन्हा मॉन्सून सक्रिय झाल्याने पावसास सुरुवात झाली. मागील दोन ते चार दिवसांत पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात कमीअधिक पाऊस पडत आहे.

Rain Update
Rain Update : जुलै महिन्यात पाऊस सरासरी गाठणार

पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातील कोथरूड येथे २२.३ मिलिमीटर पाऊस पडला. तर खडकवासला २१.५, खेड १८.८, हडपसर ११.३ मिलिमीटर पाऊस पडला असून पुणे शहर, केशवनगर, थेऊर, उरूळीकांचन, भोसरी, चिंचवड, कळस, वाघोली येथेही हलका पाऊस पडला. तर मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. या पावसामुळे भात पिकांना दिलासा मिळाला. जुन्नरमधील नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, डिंगोरे, आपटाळे, खेडमधील वाडा, राजगुरूनगर, कुडे, पाईट, चाकण, आळंदी, पिंपळगाव, कडूस आंबेगावमधील घोडेगाव, कळंब, पारगाव, मंचर मंडळातही पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या. तर शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यातही पावसाच्या बऱ्यापैकी सरी कोसळल्याने खरिपात उगवून वर आलेल्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला.

मंडळनिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :

पौड ३४.३, घोटावडे १५.५, थेरगाव, माले ५७.८, मुठे ५७.८, पिरंगुट.२२.८, भोर २०.८, भोलावडे ३१.८, नसरापूर ३९.५, किकवी, वेळू ४३.३, आंबवडे ३३.०, संगमनेर १६.०, निगुडघर २७.३, वडगाव मावळ १६.५, तळेगाव ३४.५, काले ४९.८, कार्ला २९.८, खडकाळा २२.३, लोणावळा ५५.०, शिवणे २१.५, पानशेत ४६.०, विंझर ५७.८, अंभवणे ६२.५, आंबेगाव २१.८, टाकळी १०.५, वडगाव १४.३, न्हावरा १४.३, मलठण २०.८, तळेगाव १६.८, रांजणगाव १६.८, कोरेगाव १६.८, पाबळ १४.०, बारामती ३२.०, वडगाव १५.५, उंडवडी ३०.३, भिगवण १६.८, इंदापूर ३९.५, लोणी १८.३, निमगाव २१.५, अंथुर्णी १९.५, सणसर १८.३, देऊळगाव १०.८, पाटस १०.०, यवत १४.३, कडेगाव १३.५, वरवंड २३.३, दौंड १०.८, सासवड ३३.३, भिवंडी १४.८, कुंभारवळण १८.०, जेजुरी १०.८, परिंचे १२.८, राजेवाडी १८.०, वाल्हा ११.०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com