Weather Update : कोकणात पावसाचा जोर कायम राहणार

कोकण, गोवा, कर्नाटक, केरळच्या किनाऱ्यालगत दाट ढग जमा झाले आहेत. विदर्भातही ढगांची दाटी झाली असून, उर्वरित राज्यात ऊन सावल्याचा लपंडाव सुरूच आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : कोकण किनारपट्टीवर पावसाच्या ढगांचे अच्छादन (Cloudy Weather) असल्याने पावसाचा जोर (Rainfall) कायम राहणार आहे. आज (ता.१) कोकणात जोरदार ते अतिजोरदार पावसाची (Heavy Rainfall) शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

पश्चिम मध्य अरबी समुद्रात सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण गुजरातपासून उत्तर कर्नाटक पर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाब पट्टा सक्रिय आहे. पंजाबपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

कोकण, गोवा, कर्नाटक, केरळच्या किनाऱ्यालगत दाट ढग जमा झाले आहेत. विदर्भातही ढगांची दाटी झाली असून, उर्वरित राज्यात ऊन सावल्याचा लपंडाव सुरूच आहे. उन्हाची ताप आणि उकाडा कायम असल्याचे चित्र कायम आहे. आज (ता. १) दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, विदर्भातील बुलडाणा, अकोला, वशीम, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मॉन्सूनने बहुतांश देश व्यापला

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. ३०) मोठी मजल मारत राजधानी दिल्लीसह बहुतांशी देश व्यापला आहे. राजस्थान, पंजाब, हरियाना, चंडीगडचा काही भाग वगळता उर्वरित देशात सर्वदूर मॉन्सून पोहोचला आहे. मॉन्सूनने संपूर्ण उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, दिल्लीसह. पंजाब, हरियाना, चंडीगडच्या काही भाग, राजस्थानच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. आज (ता. १) संपूर्ण पंजाब, हरियानासह, राजस्थानच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता.१) राज्यातील वादळी पावसाचा इशारा (सौजन्य : हवामान विभाग) :

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

रायगड, रत्नागिरी.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com