Weather Update : विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

राज्याच्या बहुतांशी भागात आजही पावसाची उघडीप कायम होती. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात बहुतांशी ठिकाणी पाऊस झाला नाही. तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणेः राज्याच्या बहुतांशी भागात आजही पावसाची (Rain Update Maharashtra) उघडीप कायम होती. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात बहुतांशी ठिकाणी पाऊस (Rainfall) झाला नाही. तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमीच राहील, असा अंदाज जारी केलाय.

Rain Update
Soybean Rate : यंदा किती सोयाबीन उत्पादन होणार?

कोकणात आज पावसानं उघडीप दिली होती. मात्र काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. रायगड जिल्ह्यातील माथेरान, तळा, श्रीवर्धन, पनवेल आणि मानगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर पालघर जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातही पाऊस झाला नाही,

Rain Update
Tur Production : तूर उत्पादन यंदा किती होणार?

पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, धुळे, नंदूरबार आणि सोलापूर जिल्ह्यात आज पावसाची उघडीप होती. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आणि नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे हलक्या सरी झाल्या. मात्र इतरत्र पाऊस नव्हता.

मराठवड्यातही पावसानं आज विश्रांती घेतली होती. लातूर जिल्ह्यातील लातूर मंडळात ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर नांदेड जिल्ह्यातील बिल्लोळी, औरंगाबादमधील कन्नड, बीड जिल्ह्यातील परळी वैजिनाथ, आंबोजागाई, शिरुर कासार आणि केज मंडळांमध्ये पावसाचा शिडकावा झाला.

विदर्भात तुरळक ठिकाणी आज जोरदार पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे ६० मिलिमीटर तर भामरागड मंडळात ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तर भंडारा, नागपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती आणि गोंदीया जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली. मात्र पावसाचा जोर कमीच राहीला. तर हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com