Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज पावसाचा अंदाज

आज (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज कायम आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात परतीच्या पावसाचा (Heavy Rainfall) धुमाकूळ सुरूच आहे. आज (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज (Heavy Rain Forecast With Lightning) कायम आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे.

अंदमानमधील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तमिळनाडू, केरळ ते आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वरील प्रणालीत मिसळून गेले आहेत. पंजाब आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार केला आहे. मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक आहे. कोकण आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे सर्वाधिक ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Weather Update
Maharashtra Rain News: राज्यात पाऊस ओसरला

आज (ता. २२) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

Weather Update
Weather Update : मध्य महाराष्ट्र, कोकणातपावसाचा अंदाज कायम

कमी दाब क्षेत्र होतेय तीव्र

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उद्यापर्यंत (ता. २२) ही प्रणाली आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या निर्मितीचे संकेत आहेत. ही प्रणाली उत्तरेकडे वळून पश्चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनाऱ्याकडे जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, बीड.

कोकण : माथेरान ५०, लांजा ३०, खालापूर, खेड प्रत्येकी ५०.

मध्य महाराष्ट्र : जुन्नर ११०, श्रीरामपूर ७०, पाचोरा ६०, सासवड, पेठ प्रत्येकी ६०, गारगोटी, शिरूर, माढा प्रत्येकी ५०, चंदगड, पारनेर प्रत्येकी ४०, जामखेड, सोलापूर, शिरोळ, नांदगाव, इगतपुरी प्रत्येकी ३०, कवठे महांकाळ, पुणे, आजरा, भुसावळ प्रत्येकी २०.

मराठवाडा : परळी वैजनाथ ९०, लातूर ८०, लोहारा, कळंब प्रत्येकी ७०, आष्टी, फुलंब्री, औसा प्रत्येकी ५०, केज, भूम, पाटोदा, तुळजापूर, सोनपेठ प्रत्येकी ४०, रेणापूर, वाशी प्रत्येकी ३०, औंढा नागनाथ, गंगाखेड, बदनापूर प्रत्येकी २०.

विदर्भ : बुलडाणा ३०, देऊळगाव राजा २०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com