Weather Forecast : राज्यात आजपासून पावसाचा अंदाज

राज्यात उन्हाळा हंगामाला सुरूवात झाल्याने कमाल तापमानात सातत्याने वाढ होऊन उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत.
Weather Update
Weather UpdateAgrowon

Weather Update पुणे : उन्हाचा चटका (Heat) वाढला असतानाच राज्यात पावसाला (Rain) पोषक हवामान होत आहे. आज (ता. ४) राज्यात पावसाचा अंदाज असून, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा (Rain Forecast) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका देखील कायम राहणार आहे.

राज्यात उन्हाळा हंगामाला सुरूवात झाल्याने कमाल तापमानात सातत्याने वाढ होऊन उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपूरी येथे राज्यातील उच्चांकी ३७.७ अंश तापमानाची नोंद झाली.

Weather Update
weather Update : विदर्भात उन्हाचा ताप अधिक

तर वाशिम येथे ३७.६ अंश सेल्सिअस, तर सोलापूर, रत्नागिरी, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Weather Update
Weather Update : तापमानात चढ-उतार; चटका कायम

राज्याच्या किमान तापमानात चांगलीच वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. शुक्रवारी (ता. ३) राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा १२ अंशांच्या पुढे होता. यातच आजपासून (ता. ४) राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे.

आज उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहून विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. उद्यापासून राज्याच्या विविध भागात वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.१ (१४.४), जळगाव - (१६.२), कोल्हापूर ३३.८ (१९.५), महाबळेश्वर २९.६ (१७.९), नाशिक ३४.३ (१६.७), निफाड ३४.१(१२.५), सांगली ३४.७ (१७.९), सातारा ३४.७ (१६.०), सोलापूर ३६.२ (१८.१), सांताक्रूझ ३५.५ (२२.४),

डहाणू ३२.८ (२२.४), रत्नागिरी ३६.४ (२०.२), छत्रपती संभाजीनगर ३४.० (१५.१), नांदेड - (१९.४), परभणी ३५.२(१८.०), अकोला ३६.९ (२०.५), अमरावती ३६.६(१८.७), बुलढाणा ३६.०(२०.३), ब्रह्मपूरी ३७.७ (२०.२),

चंद्रपूर ३६.६ (२०.०), गडचिरोली ३५.०(१८.६), गोंदिया ३५.० (१८.६), नागपूर ३५.७ (२०.०), वर्धा ३६.५(२०.०), वाशीम ३७.६ (१७.८), यवतमाळ ३५.५ (२०.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com