Weather Update : राज्यात पावसाचा अंदाज

राज्याच्या उत्तर भागातून मॉन्सून परतला आहे. यातच राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : राज्याच्या उत्तर भागातून मॉन्सून (Monsoon Update) परतला आहे. यातच राज्यात सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा जोर (Rain Intensity) काहीसा कमी झाला आहे. आज (ता. १७) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागासह विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (Rain Forecast With Lightning) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता कायम आहे.

मध्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, तर अग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. केरळच्या किनाऱ्यालगत असलेल्या प्रणाली पासून नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार तयार झाला आहे.

Weather Update
Soybean crop Damage : काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असून, काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. रविवारी (ता.१६) मराठवाडा, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यातील सेलू, पाथरी, पूर्णा, परभणी तालुक्यांत दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस झाला.

Weather Update
Rain Update : उघडिपीमुळे शेतीमाल शिवाराबाहेर काढण्याची लगबग

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत उद्या (ता. १८) नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे रविवारपर्यंत (ता. २०) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १५) संपूर्ण बिहार, सिक्कीम, मेघालय, मध्य प्रदेशसह आसाम त्रिपुरा पश्चिम बंगालचा काही भाग, छत्तीसगड विदर्भासह महाराष्ट्राचा आणखी काही भागातून परतले. परतीस पोषक हवामान असल्याने पुढील दोन दिवसांत विदर्भ, छत्तीसगड, अंतर्गत महाराष्ट्र, झारखंड ओडिशाच्या काही भागांतून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर.

मराठवाडा : बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद.

विदर्भ : बुलडाणा, वाशीम, यवतमाळ.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com