Weather Update : राज्यात आजपासून पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण (Cloudy Weather) तयार झाले आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान (Favorable Climate For Rain) तयार होत आहे. आजपासून (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज (Rain Forecast) हवामान विभागाने वर्तविला आहे.

Weather Update
Cloudy Weather : ढगाळ वातावरणामुळे ‘रब्बी’ अडचणीत

राज्यातील थंडी कमी झाली आहे. राज्याच्या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कायम आहे. राजस्थानातील चुरू येथे गुरुवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Weather Update
Cloudy Weather : ढगाळ वातावरणाने धास्ती

राज्यात मात्र थंडी कमी झाली असली, तरी विदर्भात मात्र किमान तापमानात घट झाली आहे. राज्यात दिवसा ढगाळ हवामानासह उकाडा चांगलाच वाढला आहे. गुरुवारी (ता. ८) गोंदिया येथे राज्यातील नीचांकी १०.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी कमाल ३४.५ अंश तापमान नोंदले गेले.

वादळी प्रणालीमुळे ढगाळ वातावरण

उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ढगाळ वातावरण झाले आहे. आजपासून (ता. ९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात; तर उद्यापासून (ता. १०) विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com