Weather Update : मध्य महाराष्ट्र, कोकणातपावसाचा अंदाज कायम

मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा दणका सुरू असतानाच उर्वरित राज्यात मात्र पाऊस ओसरला आहे. आज (ता. २१) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणकेडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा अंदाज कायम आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा (Heavy Rain) दणका सुरू असतानाच उर्वरित राज्यात मात्र पाऊस ओसरला आहे. आज (ता. २१) कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणकेडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा (Rain Forecast) अंदाज कायम आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज (Weather Forecast) आहे.

अंदमान समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रापासून तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्नेय अरबी समुद्रात केरळच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. पंजाब आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

Weather Update
Rain Update : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा कहर

मध्य महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा तडाखा कायम आहे. नगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत गुरूवारी (ता. २०) विजा, मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडला आहे. नगर, पुणे, नाशिकला पावसाचा जोर अधिक होता.

Weather Update
Rain News : अकोलखेड केंद्रावरील पाऊस नोंदींचा अचूक अहवाल मागविला

नगर जिल्ह्यातील राहाता येथे सर्वाधिक १५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (ता. २१) कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

चक्रीवादळ निर्मितीची शक्यता

बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. उद्यापर्यंत (ता. २२) ही प्रणाली आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत (ता. २४) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही प्रणाली उत्तरेकडे वळून पश्चिम बंगाल बांग्लादेशाच्या किनाऱ्याकडे जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

गुरूवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग).

कोकण : संगमेश्वर, चिपळूण प्रत्येकी २०.

मध्य महाराष्ट्र : राहाता १५०, सावळीविहीर, येवला, कोपरगाव प्रत्येकी ७०, बारामती ६०, सुरगाणा, शिरोळ, जुन्नर, संगमनेर, इगतपूरी प्रत्येकी ५०, दिंडोरी, सिन्नर, मोहोळ, जेऊर प्रत्येकी ४०, देवळा, पंढरपूर, सोलापूर, तासगाव, कळवण, नाशिक, जत, कर्जत, नेवासा, कवठेमहांकाळ प्रत्येकी ३०. मराठवाडा : सिल्लोड ३०, तुळजापूर, कळंब प्रत्येकी २०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com