Weather Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे आहे. फिरोजपूरपासून ईशान्य भारतातील आगरताळा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमानात वाढ होऊन उकाड्यातही (Temperature Increased) मोठी वाढ झाली आहे. काही ठिकाणी दुपारनंतर मेघगर्जना, विजांसह वादळी पाऊस (Rain With Lightning) हजेरी लावत आहे. आज (ता. ३१) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह (Cloudy Weather) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे आहे. फिरोजपूरपासून ईशान्य भारतातील आगरताळा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. उत्तर कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे.

Weather Update
Soybean : देशात सोयाबीन पेरणी घटली?

राज्यात ऊन सावल्यांचा खेळात उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी उन्हाच्या चटक्यामुळे तापमानात वाढ झाली. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी पडत आहेत. सांगली, नाशिक, पुणे, सातारा, नगर, नांदेड, परभणी, जालना, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

Weather Update
Cotton : कापूस निर्यातदर ही ओळख पुसली जाणार?

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

राज्यात शनिवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

मध्य महाराष्ट्र :

कवठेमहांकाळ ६०, नांदगाव, तासगाव प्रत्येकी ४०, कडेगाव, कसबेडिग्रज प्रत्येकी ३०, गगनबावडा, पलूस, चांदवड प्रत्येकी २०.

...

मराठवाडा :

हिमायतनगर ५०, अंबड, पूर्णा, घनसांगवी प्रत्येकी ३०, वसमत, किनवट, पातूर प्रत्येकी २०.

...

विदर्भ :

गोंडपिंपरी ४०, आरमोरी , सिंदेवाही, मुलचेरा, कुही, अर्जूनी मोरगाव प्रत्येकी ३०, कामठी, वणी, भामरागड, मूल, चिमूर प्रत्येकी २०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com