Weather Update : विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

विदर्भ आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर राज्याच्या अनेक भागांत पाऊस उघडीप देण्याचे संकेत आहेत.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : विदर्भ आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर राज्याच्या अनेक भागांत पाऊस (Rain) उघडीप देण्याचे संकेत आहेत. आज (ता. २०) विदर्भात विजांसह (Rain Forecast) पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) वर्तविली आहे.

Weather Update
Nagpur Rain : नागपूर विभागात सरासरी ७५.६ मिलिमीटर पाऊस

जुलै महिन्यात पूर्व किनाऱ्यावर सातत्याने टिकून असलेले कमी दाबाचे क्षेत्र, मॉन्सूनचा आस दक्षिणेकडे कायम असल्याने राज्यात पुन्हा पावसाने दाणादाण झाली. सोमवारी (ता. १८) विदर्भात जोरदार, तर कोकण, घाटमाथ्यावरही पावसाची संततधार सुरू होती. मंगळवारी (ता. १९) राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली होती. राज्यात ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू होता. आज (ता. २०) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळण्याचा अंदाज आहे.

अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे ओमानकडे सरकून विरले. तर पूर्व किनाऱ्यावरील उत्तर ओडिशा आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाकडे सरकून निवळून गेले. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकत असून, राजस्थानच्या बिकानेरपासून आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पश्‍चिम किनाऱ्याला गुजरातपासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा पुन्हा तयार झाला असून, महाराष्ट्राच्या मध्यावर पूर्व-पश्चिम परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोडक्षेत्र तयार झाले आहे.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com