Weather Update : विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

मध्य भारतातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भात अनेक ठिकाणी, उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : मध्य भारतातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भात (Rain Update Vidarbh) अनेक ठिकाणी, उर्वरित राज्यातही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी (Rainfall) लावली आहे. आज (ता. २३) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning) आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली.

Weather Update
Monsoon Rain: राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज

मॉन्सूनने वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला असून, मंगळवारी (ता. २०) राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला आहे. गुरूवारी (ता. २२) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती.

मध्य प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले असून, या भागात ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरापासून राजस्थान पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

Weather Update
Rain News : अकोलखेड केंद्रावरील पाऊस नोंदींचा अचूक अहवाल मागविला

राज्यात ढगाळ वातावरण असून, उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. २३) विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात आकाश ढगाळ राहून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली.

गुरूवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : पालघर. डहाणू २०, मोखेडा. माणगाव, तलासरी, अंबरनाथ. विक्रमगड, वसई प्रत्येकी १०.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी १०.

मराठवाडा : खुल्ताबाद ६०, धर्माबाद, अर्धापूर प्रत्येकी ३०, पाटोदा, मुदखेड, कन्नड, धारूर, बीड प्रत्येकी १०.

विदर्भ : सालकेसा ६०, अहिरी ५०, सिरोंचा ४०, पोंबुर्णा, सडकअर्जूनी, चामोर्शी, आमगाव, भामरागड, मुल, मुलचेरा, धानोरा प्रत्येकी ३०. गोरेगाव, वणी, एटापल्ली, चिखलदरा, कोर्ची, अर्जूनी मोरगाव, वरूड, भद्रावती, गोंदिया, कामठी, कुही, देवरी प्रत्येकी २०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com