Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात विजांसह पाऊस सुरू आहे. तर विदर्भात पावसाने उघडीप दिली आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात विजांसह पाऊस (Rain With Lightning In Marathada) सुरू आहे. तर विदर्भात पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. ३) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे.

उर्वरित राज्यात आकाश ढगाळ (Cloudy Weather) राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे. मॉन्सूनची जम्मू, उना, चंडीगड, कर्नाल, बागपथ, दिल्ली, अलवार, जोधपूर ते नालिया पर्यंतची परतीची सीमा रविवारी (ता.२) कायम होती.

Weather Update
Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम

पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. ईशान्य बंगालच्या उपसागरात नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

Weather Update
Rain Update : औंदा भरभरून बरसला वरुण राजा

आज (ता. २) कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता असून, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com