Weather Update ; विदर्भ, उत्तर मराठवाड्यात विजांसह पाऊस शक्य

कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर विदर्भ, उत्तर मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान (Favorable Climate Condition For Rain) होत आहे. आज (ता. १५) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ (Heavy Rain Orange Alert) देण्यात आला आहे. तर विदर्भ, उत्तर मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगरपासून बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र ते ईशान्य बंगाल उपसागरापर्यंत कायम आहे. मॉन्सूनच्या आसाचा पश्चिम भाग सर्वसाधारण स्थितीत तर पूर्व भाग दक्षिणेकडे राहण्याची शक्यता आहे. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Weather Update
Rain : मध्य प्रदेश, गुजरातेत नद्यांची पातळी वाढली

विदर्भ, मराठवाड्यात ढगांनी दाटी केली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातही ढगाळ हवामानासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे. आज (ता. १५) रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रासह कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.

Weather Update
Crop Damage : पिकातील अतिरीक्त पाणी बाहेर कसे काढाल?

कमी दाब क्षेत्र झाले तीव्र

उत्तर बंगालच्या उपसागरात उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत शनिवारी (ता. १३) तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र रविवारी (ता. १४) आणखी तीव्र झाले आहे. पश्चिमेकडे असणारी ही तीव्र कमी दाब प्रणाली (डिप्रेशन) पश्चिम बंगालच्या दिघापासून १० किलोमीटर आग्नेयेकडे, तर ओडिशाच्या बालासोरपासून पूर्वेकडे ९० किलोमीटर समुद्रात आहे. तर अग्नेय अरबी समुद्रात देखील कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी.

.........

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर.

....

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com