Weather Update : राज्याचा दक्षिण भाग, पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

राज्यात ढगाळ हवामानासह, ऊन, सावल्या अनुभवायला येत असून, काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : राज्यात ढगाळ हवामानासह (Cloudy Weather), ऊन, सावल्या अनुभवायला येत असून, काही ठिकाणी पावसाच्या सरी (Rainfall) कोसळत आहेत. आज (ता. २९) राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांसह पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Weather Update
Soybean Sowing : अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी अव्वल

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा पूर्व भाग उत्तरेकडे गेला असून, पश्‍चिम भाग दोन दिवसांत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. हा आस गंगानगरपासून ईशान्य भारतातील इंफाळपर्यंत विस्तारला आहे. उत्तर कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तमिळनाडू आणि परिसरावर तसेच बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

Weather Update
Heavy Rain : अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच

मराठवाडा, विदर्भासह राज्यात ढगाळ हवामान असून, ऊन सावल्यांचा लपंडाव सुरू आहे. अनेक ठिकाणी उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळत असल्याचे दिसून आले आहे. आज (ता. २९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात तर पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग,

मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

मराठवाडा : बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.

विदर्भ : वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com