Rain : राज्यात पावसाची उघडीप शक्‍य

या आठवड्यात महाराष्ट्रावर १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब उत्तरेस व दक्षिणेस राहणे शक्‍य असून हवेचे दाबात वाढ होत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन उघडीप अधिक काळ राहणार आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

या आठवड्यात महाराष्ट्रावर १००४ ते १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब उत्तरेस व दक्षिणेस राहणे शक्‍य असून हवेचे दाबात वाढ होत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण (Amount Of Rain) कमी होऊन उघडीप अधिक काळ राहणार आहे.

कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अल्प ते अत्यल्प (Rain Update) राहील. विदर्भात अधूनमधून हलक्‍या स्वरूपात पाऊस राहील. जोरदार पावसाची शक्‍यता (Heavy Rain Forecast) नाही. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. त्यामुळे अधूनमधून सूर्यप्रकाश जाणवेल.

१ जून ते २७ जुलैपर्यंतची हवामान स्थिती अभ्यासता, सांगली जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत जवळपास ४० टक्के कमी पाऊस झाला आहे. तर त्या त्या जिल्ह्याच्या सरासरीपेक्षा पालघर ६१ टक्के, नाशिक ९८ टक्के, उस्मानाबाद ६६ टक्के, लातूर ८५ टक्के, नांदेड १३० टक्के, परभणी ६३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्या खालोखाल पुणे, औरंगाबाद, ठाणे, बीड, जालना, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांतही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व बाबी हवामान बदलाच्या प्रभावाने झाल्या असून, खरिपातील सोयाबीनसह इतर पिकांच्या लागवडीखालील शेतात पाणी साचल्याचे चित्र होते.

Weather Update
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

कोकण ः

आज रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत पावसात उघडीप राहणे शक्‍य असून, उद्या ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आज व उद्या ३ ते ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याच्या दिशेत लवकर बदल होऊन त्याचा परिणाम नैर्ऋत्य मॉन्सून वाऱ्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होणे शक्‍य आहे. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के, तर दुपारची ६५ ते ७० टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र ः

नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत उद्या ४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत आज पावसात उघडीप राहील. जळगाव जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वाढून ताशी १२ ते १७ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ५६ टक्के राहील.

Weather Update
Soybean : देशात सोयाबीन पेरणी घटली?

मराठवाडा ः

बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत आज व उद्या पावसात उघडीप राहील. परभणी जिल्ह्यात आज ४ कि.मी. तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत आज व उद्या १२ ते २० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. या आठवड्यात वाऱ्याच्या दिशेत बदल होत असून ती वायव्येकडून राहील. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १४ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३३ ते ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५५ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ ः

बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत आज १० ते १५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाशीम जिल्ह्यात पावसात उघडीप राहणे शक्‍य आहे. उद्या अमरावती जिल्ह्यात ७ मि.मी. पावसाची शक्‍यता असून बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत पावसात उघडीप राहणे शक्‍य आहे. वाऱ्याच्या दिशेत बदल होत असून ती वायव्येकडून राहण्यामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १३ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५४ टक्के राहील.

मध्य विदर्भ ः

आज यवतमाळ जिल्ह्यात १५ मि.मी. वर्धा जिल्ह्यात ८ मि.मी. व नागपूर जिल्ह्यात ८ मि.मी., तर उद्या वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस, तर किमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७ ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४८ ते ५१ टक्के राहील.

पूर्व विदर्भ ः

आज चंद्रपूर जिल्ह्यात १५ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात ३२ मि.मी., भंडारा जिल्ह्यात १३ मि.मी. व गोंदिया जिल्ह्यात ७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या चंद्रपूर जिल्ह्यात ११ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात १४ मि.मी., भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत पावसात उघडीप राहणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग २ ते ४ कि.मी. राहील. कमाल तापमान चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८७ टक्के व दुपारची ५० टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र ः

आज कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत १२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित पुणे, सातारा व नगर जिल्ह्यांत आज व उद्या पावसाची शक्‍यता नाही. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहण्यामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील.

कृषी सल्ला ः

- कपाशीमध्ये रस शोषणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी सापळा पिकांची लागवड करावी.

- भात खाचरात पाण्याची पातळी ५ सेंमीपर्यंत नियंत्रित करावी.

- वाढीच्या अवस्थेतील पिकांमध्ये कोळपणी व खुरपणी करून तण नियंत्रण करावे.

- आडसाली ऊस लागवड पूर्ण करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com