Rain Update : पुणे जिल्ह्यात वाढला पावसाचा जोर

परतीचा पाऊस सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना राज्यासह जिल्ह्यात पावसाचा पुन्हा जोर वाढला आहे. बुधवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत पुरंदर, दौड, शिरूर, जुन्नर, भोर, पुणे शहर, बारामती या तालुक्यांत जोरदार पाऊस पडला.
Pune Rain Update
Pune Rain UpdateAgrowon

पुणे : परतीचा पाऊस (Return Rain) सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना राज्यासह जिल्ह्यात पावसाचा पुन्हा जोर (Rain Intensity) वाढला आहे. बुधवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत पुरंदर, दौड, शिरूर, जुन्नर, भोर, पुणे शहर, बारामती या तालुक्यांत जोरदार पाऊस (Heavy Rainfall Pune) पडला. या पावसामुळे ओढे, नाले पुन्हा ओसंडून वाहत असल्याने अनेकांच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे पिकांचे काही प्रमाणात नुकसान (Crop Damage Pune) झाले. तर बारामती भागात ओढ्यांना पूर आल्याने नागरिकांना पर्यायी रस्ते शोधावे लागले.

Pune Rain Update
Crop Damage : ‘जणू आभाळ फाटलं, अतिवृष्टीने ना पिके वाचली ना शेती’

गेल्या काही दिवस पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. त्यामुळे उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्यात चांगलीच वाढ झाली होती. परंतु मंगळवारपासून (ता. ६) पावसास सुरूवात झाली. बुधवारीही दुपारपासून चांगलाच पाऊस बरसला. त्यामुळे पिकांना दिलासा मिळत असला तरी काही ठिकाणी ढगफुटीसद्श्य पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले.

Pune Rain Update
Rain Update: सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम पाऊस

जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात राजुरी, बेल्हे भागात, पुरंदर तालुक्यात नीरा, गुळूंचेपर्यंत आणि बारामती तालुक्यातील आठ फाटा, दहा फाटा, निंबूत, फरांदेनगरपासून करंजेपूलपर्यंत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला. संध्याकाळी सुरू झालेल्या पावसाने ओढ्या, नाल्यांना पूर आला. त्यामुळे ओढ्याजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या घरांत पाणी शिरले. पिकांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने शेताला तळ्याचे स्वरूप आले. सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, बटाटा, फ्लॉवर, कोबी, वाटाणा पिकांना धोका निर्माण झाला आहे. हा पाऊस भात, खरिपातील काही पिके व उसासाठी चांगला असला तरी कंदवर्गीय पिकांना नुकसानकारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे करपा, कुज, सडचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत मंडळनिहाय झालेला पाऊस, मि.मी:

हवेली - पुणे वेधशाळा, केशवनगर २२, उरूळीकांचन ११, खेड १०, हडपसर ३१,

भोर - भोर १०, किकवी ८४, वेळू ३१, आंबवडे २१, संगमनेर १७, निगुडघर १५

वेल्हा - वेल्हा २२, विंझर १८,

जुन्नर - नारायणगाव ४३, वडगाव आनंद १९, निमगाव सावा ११४, बेल्हा ११४, डिंगोरे १३,

आंबेगाव - घोडेगाव १०, कळंब ३३,

शिरूर - टाकळी १३, मलठण १३, तळेगाव ५७, रांजणगाव १३, कोरेगाव ५७,

बारामती - माळेगाव १३, पणदरे १८, वडगाव २५, लोणी ६४,

दौंड - यवत ४४, कडेगाव १४, राहू ११८,

पुरंदर - सासवड ६१, भिवंडी १५, कुंभारवळण ६७, जेजुरी १५, परिंचे ६६, राजेवाडी ६७, वाल्हा ४५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com