Rain : शिरूर तालुक्यासह अनेक भागांत पावसाची उघडीप

गेल्या आठ दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी कमी-अधिक स्वरूपात पाऊस पडत आहे.
Rain
RainAgrowon

पुणे : गेल्या आठ दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर (Rain Intensity) कमी झाला आहे. काही ठिकाणी कमी-अधिक स्वरूपात पाऊस (Rainfall) पडत आहे. बुधवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यंत राजूरमध्ये २० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामुळे धरणांतील पाण्याच्या आवकेतही (Water Arrival In Dam) चांगलीच घट झाली आहे.

Rain
Fertilizer : कायद्यातील पळवाटा भेसळखोरांच्या पथ्यावर

जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाचा जोर अधिक असल्याने ओढे, नाले भरून वाहू लागले होते. त्यामुळे धरणांतील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली होती. परंतु आता पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे पश्‍चिम पट्ट्यात रखडलेल्या भात लागवडींना चांगलाच वेग आला आहे. अनेक ठिकाणी भात लागवडी उरकल्या असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी भात लागवडी अंतिम टप्प्यात आहेत. पूर्व भागातील शिरूर, खेड, दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर तालुक्यांत पावसाने चांगलीच उघडीप घेतली आहे. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत आहे. त्यामुळे पिके वाफसा स्थितीत असल्याने खरिपातील पिकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळत आहे.

Rain
Kharif Sowing : पुणे विभागात पेरणीच्या क्षेत्रात वाढ

मावळ तालुक्यातील लोणावळा येथे १६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. गेल्या पंधरवड्यात लोणावळा भागात मुसळधार पाऊस बरसला होता. त्यानंतर या भागात काहीसा जोर कमी झाला आहे. त्यानंतर वडगाव मावळ, तळेगाव, काले, कार्ला, खडकाळा, शिवणे येथेही पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.

जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे ११ मिलिमीटर, बेल्हा १५ मिलिमीटर, तर जुन्नर, नारायणगाव, वडगाव आनंद, डिंगोरे, आपटाळे, ओतूर भागांत हलक्या सरी पडल्या. हवेली तालुक्यातील पुणे वेधशाळा, खडकवासला, भोसरी, चिंचवड, मुळशी तालुक्यांतील थेरगाव, माले, मुठे, भोर तालुक्यांतील भोलावडे, नसरापूर, आंबवडे, संगमनेर, निगुडघर येथे, तर वेल्हा तालुक्यातील वेल्हा, पानशेत, विंझर, आंबवणे, तसेच खेड तालुक्यातील वाडा, कुडे, चाकण, कडूस. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, कळंब, पारगाव, मंचर, बारामती तालुक्यातील माळेगाव, पणदरे, लोणी, सुपा, उंडवडी इंदापुरातील लोणी, निमगाव, सणसर, दौंडमधील राहू भागांत तुरळक सरी बरसल्या असून देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड या भागांत ढगाळ वातावरण होते. पुरंदरमधील सासवड, भिवंडी येथेही हलक्या सरी पडल्या असून, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा ढगाळ हवामान होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com