Rain Update : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेडला पावसाने झोडपले

दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोल्हापूरच्या घाटमाथ्याला मुसळधार पावसाने झोडपले. अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळित झाले.
Rain Update
Rain Update Agrowon

पुणे : दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोल्हापूरच्या घाटमाथ्याला मुसळधार पावसाने (Heavy Rainfall Maharashtra) झोडपले. अतिवृष्टी (excessive Rain) झाल्याने जनजीवन विस्कळित झाले. मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळला. तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले.

Rain Update
Rain : राज्यात विविध भागांत मुसळधार पावसाची हजेरी

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाने झोडपले असून, नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटली आहे. रत्नागिरीतील राजापूर लांजा येथे राज्यातील सर्वाधिक १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, मालवण येथे १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला.

Rain Update
Rain : पूर्व विदर्भात जोर वाढणार

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यासह जिल्ह्याच्या इतरही भागात जोरदार पाऊस झाला आहे. गगनबावडा येथे १६० मिलिमीटर तर आजरा येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. तर पुणे, नाशिक, धुळे, नगर, नंदूरबार जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले आहे. किनवट येथे १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर परभणी, हिंगोली जिल्ह्यातही हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. निम्न दुधना, विष्णुपुरी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील दुधड, शेकटा परिसरात झालेल्या पावसाने लाहूकी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. विदर्भातही पावसाने हजेरी लावली असून, बुलडाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.

रविवार (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : राजापूर, लांजा प्रत्येकी १७०, वैभववाडी १५०, कुडाळ १४०, दोडामार्ग १३०, कणकवली, वेंगुर्ला प्रत्येकी १२०, मालवण १००, देवगड ८०, मुरबाड, रामेश्वर प्रत्येकी ७०, रत्नागिरी ६०.

मध्य महाराष्ट्र :

गगनबावडा १६०, आजरा ११०, चंदगड ८०, गडहिंग्लज ५०, चाळीसगाव, धुळे, शाहूवाडी, राधानगरी, कोल्हापूर, भोर प्रत्येकी ४०, इगतपुरी, ओझरखेडा, गिरणा धरण, जुन्नर, गिधाडे, भडगाव, नवापूर, कागल, रावेर प्रत्येकी ३०.

मराठवाडा :

किनवट १२०, माहूर ७०, बिलोली ६०, सेलू ४०, देगलूर, रेणापूर, नायगाव खैरगाव, वाशी, निलंगा, केज प्रत्येकी ३० मिलिमीटर.

विदर्भ :

सिरोंचा ७०, पांढरकवडा ५०, जेवती, राळेगाव प्रत्येकी ४०, संग्रामपूर, वरोरा, जळगाव जामोद, घाटंजी प्रत्येकी ३०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com