कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता
Rain UpdateAgrowon

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाची शक्यता

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने राज्यात अंशतः ढगाळ वातावरण होत आहे.

पुणे : पूर्वमोसमी पावसाला (Pre Season Rain) पोषक हवामान झाल्याने राज्यात अंशतः ढगाळ वातावरण (Cloudy Weather) होत आहे. उन्हाचा (Heat) चटका कमी अधिक होत असून, उकाडाही वाढला आहे. आज (ता. २८) विदर्भात मेघगर्जना, विजांसह पावसाची शक्यता असून, कोकण, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज (Rain Prediction) हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्र, कोकणात कमाल तापमान ३७ अंशांच्याही खाली आले आहे. तर मराठवाड्यात ४१ अंश, तर विदर्भात बहुतांशी भागात ४२ अंशाच्या खाली आले आहे. राज्यात उकाडा वाढली असून, उन्हाचा चटका अद्यापही तापदायक ठरत आहे.

वायव्य राजस्थानपासून ओडिशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर उत्तर कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शुक्रवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.१, धुळे ४०.०, जळगाव ४०.८, कोल्हापूर ३३.६, महाबळेश्वर २९.१, नाशिक ३५.३, निफाड ३६.६, सांगली ३५.२, सातारा ३५.४, सोलापूर ३७.६, सांताक्रूझ ३४.४, डहाणू ३५.४, रत्नागिरी ३४.१, औरंगाबाद ३८.५, परभणी ४०.३, नांदेड ३९.८, अकोला ४२.१, अमरावती ४१.२, बुलडाणा ३९.०, ब्रह्मपुरी ४१.०, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ३९.२, नागपूर ४१.०, वर्धा ४१.२, यवतमाळ ४०.५.=

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com