Rain Update : पावसाचे सर्वदूर पुनरागमन

गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी-वाऱ्यासह पाऊस झाल्याने पिकांचे नुकसानही झाल्याचा प्रकार घडला.
Rain Update
Rain Update Agrowon

अकोला ः गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे (Rain Update) दमदार पुनरागमन (Rain Return) झाले आहे. अनेक ठिकाणी वादळी-वाऱ्यासह पाऊस झाल्याने पिकांचे नुकसानही (Crop Damage) झाल्याचा प्रकार घडला. प्रामुख्याने कपाशी पिकाला या वादळाचा अधिक तडाखा बसला आहे.

Rain Update
Maharashtra Rain News: राज्यात पाऊस ओसरला

या भागात जवळपास १५ दिवस पावसाने उघडीप दिली होती. काही ठिकाणी पाऊस नसल्याने सोयाबीन सुकायला लागले होते. सिंचनाची सोय असलेल्यांनी पिकाला पाणी द्यायला सुरुवातही केली होती. अशातच रविवारपासून (ता. ११) पावसाने पुनरागमन झाले. गेल्या २४ तासांत अकोला जिल्ह्यात सरासरी १०.५ मिमी पावसाची नोंद झाली. प्रामुख्याने तेल्हारा तालुक्यात २२.७ मिमी पाऊस झाला. अकोट, बाळापूर, अकोला तालुक्यात पाऊस जोरदार झाला आहे. खारपाण पट्ट्यात काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला.

बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव जामोद, देऊळगावराजा, मोताळा या तालुक्यांमध्ये वादळासह आलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. दुसरीकडे या पावसामुळे पिकांना फायदासुद्धा झाला आहे. सोयाबीन पिकात शेंगामध्ये दाणे परिपक्व होण्याची अवस्था सुरू असल्याने पावसाची नितांत गरज निर्माण झाली होती.

संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टी

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सोमवारी (ता.१२) सकाळी गेल्या २४ तासांत अतिवृष्टीची नोंद झाली. या तालुक्यातील बावनबीर या महसूल मंडलात तब्बल ११३ मिलिमीटर पाऊस नोंदवण्यात आला. याशिवाय संग्रामपूर ८५.५, सोनाळा ४५, पातुर्डा ६२.८, कवठळ ५६.८ व तालुक्यात सरासरी ७२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लगतच्या जळगाव जामोद तालुक्यातही सरासरी ४०.५ मिलिमीटर पाऊस झाला. वडशिंगी मंडलात ५६.८ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. जिल्ह्यात खामगाव ४०.३, शेगाव ४८.२, बुलडाणा ४८.८ मिलिमीटर असा दमदार पाऊस पडलेला आहे.

शिवणी आरमाळ (ता. देऊळगावराजा, जि. बुलडाणा) शिवारात वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात धुवाधार पाऊस झाला. यामुळे कपाशी व सोयाबीन पिकांचे अंदाजे १०० हेक्टरपर्यंत नुकसानीची शक्यता आहे. कपाशीला बोंड व सोयाबीनला शेंगा लागलेल्या आहेत. परंतु वादळी वाऱ्यासह अति पावसामुळे कपाशी व सोयाबीनच्या फांद्या मोडल्या. झाडे जमीनदोस्त झाली. कृषी विभागाने तत्काळ नुकसानाचे पंचनामे करून भरपाई दिली पाहिजे.
कैलास नागरे, शेतकरी, शिवणी आरमाळ, जि. बुलडाणा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com