Weather Update : राज्यात अनेक भागात पावसाने पुनरागमन

पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाली. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने अनेक भागात विजांसह पावसाने पुनरागमन केले आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका (Temperature) आणि उकाड्यात (Heat) चांगलीच वाढ झाली. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने अनेक भागात विजांसह पावसाने (Rainfall With lightning) पुनरागमन केले आहे. आज (ता. ३१) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Weather Update
Rain : जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंब

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. अंतर्गत तमिळनाडू आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून पश्चिम विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत असून, विजांसह पावसाला पोषक हवामान होत आहे.

Weather Update
Rain Alert : राज्यात ठिकठिकाणी पावसाचा इशारा !

पावसाची उघडीप दिल्यानंतर राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. यातच पावसाला पोषक हवामान झाल्याने विदर्भात अनेक ठिकाणी तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. ३१) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग.

मध्य महाराष्ट्र : जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

कोकण : कुडाळ, सावंतवाडी प्रत्येकी १०.

मध्य महाराष्ट्र : कवठे महांकाळ, मालेगाव प्रत्येकी ३०, रावेर १०.

मराठवाडा : उमरगा ४०, धर्माबाद, घनसांगवी, फुलंब्री प्रत्येकी २०, नायगाव खैरगाव, पाथरी, अर्धापूर प्रत्येकी १०.

विदर्भ : सावळी, मुल प्रत्येकी ५०, आरमोरी, धानोरा प्रत्येकी ४०, एटापल्ली, गडचिरोली, घाटंजी, राळेगाव, सालकेसा, आर्णी, सडकअर्जूनी, कोर्ची, पांढरी कवडा, मोरगाव अर्जुनी, मारेगाव प्रत्येकी ३०, सेलू, परतवाडा, देसाईगंज, वरोरा, समुद्रपूर, दिग्रस, गोरेगाव, आष्टी, कुरखेडा, आमगाव, हिंगणघाट, कळंब, चांदूर रेल्वे, वरूड, महागाव प्रत्येकी २०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com