राज्यात अनेक भागात बरसल्या सरी

खरिपाच्या पेरण्यांना येणार वेग; जोरदार पावसाची प्रतीक्षा
राज्यात अनेक भागात बरसल्या सरी
Rain UpdateAgrowon

पुणे : मॉन्सून पाऊस (Monsoon Rain) राज्याच्या विविध भागात सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी (Rainfall) लावली आहे. या पावसाने खरिपाच्या पेरण्यांना (Kharif Sowing) वेग येणार आहे. पेरणी झालेल्या पिकांनाही पावसामुळे दिलासा मिळाला आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

गुरुवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणात पावसाची संततधार कायम आहे. पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. सिंधुदुर्गातील मालवण येथे सर्वाधिक १४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही चांगल्या पावसाने हजेरी लावली. कळवण येथे ७५ मिलिमीटर पाऊस पडला. या शिवाय नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडल्या.

मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, परभणी, बीड, जालना जिल्ह्यांत काही ठिकाणी चांगला पाऊस झाला. मराठवाड्यासह विदर्भातही हलक्या पावसाच्या सरी पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. या पावसाने पेरण्यांना वेग येणार असला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास राज्याच्या घाटमाथ्यावर, धरणांच्या पाणलोटांमध्ये जोरदार पावसाची आवश्यकता आहे.


गुरुवारी (ता. २३) राज्याच्या विविध भागात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :  
कोकण :
पालघर : पालघर ४२, वसई ३२, वाडा ४६.
रायगड : कर्जत ४२, खालापूर ६७, माथेरान ६६.
सिंधुदुर्ग : कणकवली ५९, कुडाळ ४२, मालवण १४१, सावंतवाडी ४३, वेंगुर्ला ४१.
ठाणे : कल्याण ५५, शहापूर ५७, ठाणे ५५.

मध्य महाराष्ट्र :
नगर : पाथर्डी ३६, राहुरी ४२.
नाशिक : देवळा ६३, गिरणाधरण ५१, इगतपुरी ४२, कळवण ७५, सटाणा ६३, सुरगाणा ४०.
पुणे : वेल्हे ५०.
सोलापूर : जेऊर ५०, माढा ३०, सांगोला ४५.

मराठवाडा :
औरंगाबाद : गंगापूर ४०, सोयगाव ३३, खुलताबाद ५३.
बीड : माजलगाव ५१,
जालना : घनसांगवी ४०, जालना ४०.
परभणी : धालेगाव ३०, गंगाखेड ४०, पाथरी ३२.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com