Rain : पश्‍चिम पट्ट्यात पावसाची विश्रांती

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सलग अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यातच मुळशी, वळवण, ठोकरवाडी या घाटमाथ्यावर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : मुसळधार पाऊस (Heavy Rain Pune) कोसळल्यानंतर आता पुणे जिल्ह्यात पावसाने उघडीप देण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम पट्ट्यातही मावळ वगळता मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड तालुक्यात पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतीकांमाना (Agriculture Work Start) सुरुवात झाली आहे. शेताशेतात भात लागवडीसाठी (Paddy Cultivation) मजुरांची लगबग पाहावयास मिळत आहे.

Rain Update
Pune Rain : पुणे जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सलग अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यातच मुळशी, वळवण, ठोकरवाडी या घाटमाथ्यावर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. पावसामुळे भात खाचरे भरून वाहत आहेत. धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढली होती. सध्या जिल्ह्यातील बहुतांश धरणे ही ५० टक्क्यांहून अधिक भरली आहेत. तर, तीन धरणे ही शंभर टक्के भरली आहेत.

Rain Update
Crop Damage : संततधार पाऊस, पुरामुळे ३३ हजार हेक्टरला फटका

हवेलीतील पुणे वेधशाळा, खडकवासला, भोसरी, चिंचवड या भागांत गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये तुरळक सरी बरसल्या. तर केशवनगर, कोथरूड, थेऊर, उरुळी कांचन, खेड शिवापूर, कळस, हडपसर, वाघोली अंशतः ढगाळ वातावरण होते. मुळशीतील मुठा येथे २५ मिलिमीटर पाऊस पडला असून पौड, घोटावडे, थेरगाव, माले, पिरंगुट या भागांत तुरळक सरी पडल्या. भोरमधील निगुडघर १२ मिलिमीटर, भोर, भोलावडे, नसरापूर, किकवी, वेळू, आंबवडे, संगमनेर हलका पाऊस पडला. मावळमधील लोणावळा ३९, कार्ला ३५, खडकाळा २९, काळे २४, शिवणे २२, वडगाव मावळ ११ मिलिमीटर पाऊस पडला.

वेल्हा तालुक्यातील पानशेत, विंझर, आंबवणे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. जुन्नरमधील राजूर ४२ मिलिमीटर पाऊस पडला असून जुन्नर, नारायणगाव, वडगाव आनंद, डिंगोरे, आपटाळे, ओतूर हलक्या सरी तर निमगाव सावा, बेल्हा या भागात ढगाळ वातावरण होते. खेडमधील वाडा, कुडे, पाईट, चाकण, कडूस येथे तुरळक पाऊस पडला. तर आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, राजगुरुनगर ढगाळ वातावरण होते. आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, मंचर या भागातही पावसाचा शिडकावा झाला. इंदापुरातील लोणी येथे पावसाच्या तुरळक सरी पडल्या. तर, शिरूर, बारामती, दौड, पुरंदर भागांत पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. या भागात अधूनमधून ऊन पडत असल्याने पिकेही वाफसा स्थितीत येत आहे.

तालुकानिहाय गुरुवारी (ता.२१) सकाळी आठवाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये

तालुका --- पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

हवेली -- १.१०

मुळशी -- ७.८३

भोर --- ५.१३

मावळ --- २४.००

वेल्हा --- ४.५०

जुन्नर -- ७.७८

खेड --- २.२२

आंबेगाव -- ५.८०

इंदापूर -- ०.१३

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com