Weather Update : राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. २८) दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) उघडीप दिल्याने उन्हाचा चटका (Temperature) आणि उकाड्यात (Heat) वाढ झाली आहे. आज (ता. २८) दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज (Rain Forecast With Lightning) आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Heavy Rain
Rain : पावसाच्या उघडिपीमुळे धरणांतून विसर्ग घटविला

वायव्य राजस्थान आणि पाकिस्तान परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय निवळून गेले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला आहे. बिहार आणि परिसरावर तसेच बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत आहेत. आंध्र प्रदेशापासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Heavy Rain
Rain : जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंब

राज्यात अंशतः ढगाळ हवामान असले तरी पावसाची उघडीप कायम आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. आज (ता. २८) मध्य महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसह पूर्व विदर्भातील जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीप राहण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

सोलापूर, सांगली, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com