Weather Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे गेला असून, पंजाबच्या अमृतसर पासून, बरेली, बहारीच ते पूर्वेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे सक्रिय आहे. छत्तीसगड पासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
Rain
Rain Agrown

पुणे : मॉन्सूनचे (Monsoon) प्रवाह कमजोर झाल्याने राज्यात पावसाने (Rain) उघडीप दिली आहे. उन्हाचा चटका (Temperature) आणि उकाडा कायम आहे. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी येत आहेत. आज (ता. २) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning) आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीपीसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

Rain
काय तो पाऊस, काय ते बेड, काय ती पिकं, सगळं ओकेमधे...

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे गेला असून, पंजाबच्या अमृतसर पासून, बरेली, बहारीच ते पूर्वेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे सक्रिय आहे. छत्तीसगड पासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. रायलसीमा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे सरकली आहे.

पावसाने उघडीप दिल्यानंतर उन्हाच्या चटक्यामुळे कमाल किमान तापमान आणि उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी पावसाची एखादी दुसरी सर येत असून, त्यामुळे उकाड्यात वाढ होत असल्याचे चित्र आहे. आज (ता. २) विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

विदर्भ : अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com