Weather Update : पूर्व विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज

मॉन्सूनच्या पावसाने उघडीप घेतल्याने राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान आहे. आज (ता. २२) पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : मॉन्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) उघडीप घेतल्याने राज्याच्या अनेक भागांत ढगाळ हवामान (Cloudy Weather) आहे. आज (ता. २२) पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहून, हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

उत्तरेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस, पश्‍चिम किनारापट्टीलगत असलेला कमी दाबाचा पट्टा निवळल्याने राज्याच्या विविध भागांत पावसाने उघडीप दिली आहे. गुरुवारी (ता. २१) ढगाळ हवामान, ऊन-सावल्यांचा लपंडाव सुरू होता. आज (ता. २२) पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, पूर्व मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीप मिळण्याचा अंदाज आहे.

Weather Update
Rain Update : धरणक्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकून त्याच्या सर्वसामान्य स्थितीमध्ये आहे. राजस्थानच्या गंगानगरपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हा पट्टा सक्रिय सक्रिय आहे. झारखंड आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Weather Update
Nagpur Rain : नागपूर विभागात सरासरी ७५.६ मिलिमीटर पाऊस

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

लातूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.

हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी

राज्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. गुरुवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे सर्वाधिक ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर गोंदियातील अर्जुनी मोरगाव येथे ७० मिलिमीटर पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

गुरुवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : शहापूर, मुरबाड प्रत्येकी ५०, कल्याण, ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर प्रत्येकी ४०, माथेरान, पेण, उरण, कर्जत, जव्हार, पोलादपूर प्रत्येकी ३०.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ९०, सातारा ४० लोणावळा प्रत्येकी ४०. मराठवाडा : उमरी ५०, धर्माबाद, नांदेड, खुलताबाद प्रत्येकी ४०, भोकर ३०, जळकोट ३०.

विदर्भ : अर्जुनी मोरगाव ७०, साकोली ५०, लाखणी ४०, सिरोंचा, सडकअर्जुनी प्रत्येकी ३०. घाटमाथा : डुंगरवाडी ६०, लोणावळा, शिरगाव, दावडी, खोपोली प्रत्येकी ५०, कोयना नवजा, ताम्हिणी, खंद प्रत्येकी ४०.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com