Weather Update : राज्यात पावसाचा `येलो अलर्ट`

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मात्र इतरत्र ढगाळ वातावरण होते. रायगड आणि पालघर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणेः राज्यातील अनेक भागांत गुरुवारी जोरदार पावसाच्या सरी (Rain Update) झाल्या. तर इतरत्र हलक्या पावसाने हजेरी (Rainfall) लावली. भारतीय हवामान विभागाने (Weather Department) उद्या सकाळपर्यंत राज्यात पावसाचा येलो अलर्ट (Rain Yellow Alert) जारी केलाय. तर इतर ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी पडतील, असा अंदाज व्यक्त केलाय.

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मात्र इतरत्र ढगाळ वातावरण होते. रायगड आणि पालघर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाऊस झाला. काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. सांगली जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सातारा जिल्ह्यात हलक्या पावसाचा शिडकावा अनेक भागांत झाला.

Rain Update
Crop Damage : संततधार पाऊस, पुरामुळे ३३ हजार हेक्टरला फटका

पुणे जिल्ह्यातही गुरुवारी काही भागांत जोरदार पाऊस झाला. तर बहुतेक ठिकाणी पावसाची भूरभूर सुरु होती. पुणे जिल्ह्यात गुरुवारी ऊन-पावसाचा खेळा पाहायला मिळाला. नगर जिल्ह्यात धरणक्षेत्रात मध्यम पावसाच्या सरी पडल्या. मात्र इतर ठिकाणी पावसाची उघडीप होती. खानदेशातही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.

Rain Update
Rain Update : राजूरला ४२ मिलिमीटर पाऊस

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात काही मंडळात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. तर अनेक मंडळांमध्ये हलका पाऊस झाला. उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यांतही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाचा जोर कमी होता. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. अनेक भागांत ऊन पडले होते. तर काही भागांत ढगाळ वातावरण होते.

विदर्भातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमद्ये काही भागांत जोरदार पाऊस झाला. तर अनेक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. विदर्भातील इतर जिल्ह्यांतही काही मंडळांमध्ये पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाचा जोर कमी होता.

तर हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत राज्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com