Rain Update : मराठवाडा, विदर्भात पावसाचा येलो अलर्ट

राज्याच्या अनेक भागांत मंगळवारी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. तर इतर ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मात्र बहुतेक भागांत ढगाळ वातावरण होते.
Rain Updates
Rain UpdatesAgrowon

पुणेः राज्याच्या अनेक भागांत मंगळवारी मध्यम ते जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. तर इतर ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मात्र बहुतेक भागांत ढगाळ वातावरण (Cloudy Weather) होते. हवामान विभागाने (Weather Department) उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Rain Yellow Alert) जारी केला.

कोकणातील बहुतांशी भागांत पावसाचा जोर कमी होता. काही ठिकाणी जोरदार सरी पडल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी झाल्या. तर रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रांत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पडल्या. इतर भागांत मात्र तुरळक ठिकाणी पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात कोयना धरणक्षेत्रात पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातही काही भागात पावसाने हजेरी लावली होती. नाशिक जिल्ह्यात मात्र ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. तर पुणे जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. घाटमाथ्यावर हलक्या पावसाच्या सरी पडल्या.

Rain Updates
Soybean : सोयाबीनच्या पेरणी क्षेत्राने ओलांडला सरासरी क्षेत्राचा टप्पा

मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, जालना, लातूर, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत ठिकठिकाणी हलका पाऊस झाला. तर काही मंडळांत जोरदार सरी पडल्या. परभणी जिल्ह्यातील ४९ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. गंगाखेड तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. तर हिंगोली जिल्ह्यातील २८ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी तालुक्यातील काही मंडळांमध्ये पावसाचा जोर होता. नांदेड जिल्ह्यात मात्र जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक मंडळात मुसळधार पाऊस पडला. तर इतर भागांत हलक्या सरी झाल्या.

Rain Updates
Soybean Sowing : अकोला जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी अव्वल

विदर्भातही हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, गोंदीया जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर इतर भागांत पावसाचा जोर कमी होता. अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील बहुतेक भागांत पावसाची उघडीप होती. मात्र काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

भारतीय हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला. तर मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह मुसळधारेचा अंदाज दिलाय. तसंच विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com