Rain Alert : विदर्भात पावसाचा येलो अलर्ट

कोकणात सोमवारी काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होता. अनेक ठिकाणी हलक्या सरी झाल्या.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणेः राज्यात सोमवारी काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाने (Rain Update) हजेरी लावली. तर काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या (Heavy Rain). जालना, नांदेड आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. हवामान विभागाने (Weather Update) उद्या सकाळपर्यंत विदर्भात जोरदार पावसाचा येलो अर्ट (Rain Yellow Alert In Vidarbh) जारी केला.

कोकणात सोमवारी काही भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होता. अनेक ठिकाणी हलक्या सरी झाल्या. वैभववाडी तालुक्यात मात्र काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. इतर भागात मात्र हलक्या सरी पडल्या. चिपळूण तालुक्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.

Heavy Rain
Rain Update : धरणक्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. कागल, गारगोटी, हातकणंगले, गडहिंग्लज, पन्हाळा, गगणबावडा या तालुक्यात काही भागात हलक्या सरी पडल्या. तर राधानगरी तालुक्यात काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या. पुणे जिल्ह्यातील काही भागांतही जोरदार सरी झाल्या. तर बऱ्याच भागात पावसाची भूरभूर सुरु होती. नाशिक जिल्ह्यात सोमवारी इगतपूर आणि सुरगणा तालुक्यातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात बहुतेक भागांत ढगाळ वातावरण होते. खानदेशातही ठिकाठिकाणी पावसाने हजेरी लावली. नगर जिल्ह्यात हरिचंद्रगड, कळसुबाई, घाटघर पट्ट्यात हलका पाऊस झाला.

Heavy Rain
Heavy Rain : अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच

मराठवाड्यातील बहुतेक भागांत सोमवारी पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील बहुतांश मंडळात पावसाची रिमझिम सुरु होती. जालना जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. जालना जिल्ह्यातील जिल्ह्यातील भोकरदन मंडळात ६६.५ मिलिमीटर तर केदारखेडा मंडळात सर्वाधिक ८४.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात मात्र सोमवारी पावसाचा जोर कमी झाला होता. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही हलका ते मध्यम पाऊस झाला.

विदर्भात मात्र अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. बुलडाणा, वाशीम आणि अकोला जिल्ह्यांत अनेक मंडळांत मध्यम पाऊस झाला. तर पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदीया आणि नागपूर या जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण अधिक होते.

हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी केला. बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com