Weather Update : राज्यात पावसाची जोरदार `बॅटींग`

राज्यात सर्वदूर पाऊस हजेरी लावतोय. राज्यातील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला. तर इतर मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे ः राज्यात सर्वदूर पाऊस (Rainfall) हजेरी लावतोय. राज्यातील अनेक मंडळांमध्ये जोरदार पाऊस (Heavy Rain) झाला. तर इतर मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या. तर हवामान विभागानं (Weather Department) उद्या सकाळपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Heavy Rain Yellow Alert) जारी केलाय. तिकडं माॅन्सूनचा परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) तीन दिवसांपासून थांबलेला आहे.

Weather Update
Rain Update : जळगावमधील ११ प्रकल्प १०० टक्के भरले

आज कोकणातील बहुतांशी मंडळांमध्ये पाऊस झाला. रत्नागिरी येथे सर्वाधिक १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर चिपळूण, हर्णे, पेण, लांजा, संगमेश्वर, राजापूर मंडळांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मंडळात ७० मिलिमीटर पाऊस झाला. मालवण, कुडाळ, सावंतवाडी येथे पावसानं हजेरी लावली. पालघर जिल्ह्यातील मोखेडा, वाडा, जव्हार मंडळांमध्ये पाऊस पडला. तर रायगड जिल्ह्यातील मुरुड, श्रीवर्धन, उरण, महाड, अलिबाग मंडळात हलक्या ते मध्यम सरी पडल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील गगणबाडा येथे १३० मिलिमीटर तर नगर जिल्ह्यातील नेवासा येथे १०० मिलिमीटर पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, हातकणंगले, पन्हाळा, शिरोळ मंडळांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. तर नगर जिल्ह्यातील कर्जत, श्रीगोंदा, श्रीरामपूर, जामखेड, कोपरगाव आणि राहता मंडळात पावसाने हजेरी लावली. तसचं सातारा जिल्ह्यातील कराड, महाबळेश्वर, पाटण, पाडेगाव, वाई येथे जोरदार पाऊस झाला.

Weather Update
Rain Update : परभणी, हिंगोलीतील ८२ मंडलांत पाऊस

पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि इतर मंडळांमध्ये पावसानं हजेरी लावली. सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ, तासगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, जेऊर येथे पाऊस पडला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चोपडा, एरंडोल आणि नाशिक चांदवड, नांदगाव येथे पावसानं हजेरी लावली.

विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे ६० मिलिमीटर पाऊस झाला. तर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बाळापूर, अकोला, बार्शीटाकळी येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यातील धरणी, चांदूरबाजार येथे मुसळधार पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्यातील डिग्रस, नेर, अर्णी, यवतमाळ, दारव्हा येथेही जोरदार पावसानं हजेरी लावली. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, शेगाव, खामगाव आदी मंडळांमध्ये पाऊस झाला.

मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथे १२० मिलिमीटर पाऊस झाला. उस्मानाबाद, लोहारा आणि तुळजापूर येथे जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, खुलताबाद, पैठण आणि गंगापूर या मंडळांमध्ये प्रत्येकी ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील आष्टी, शिरुर कासार, धारुर आणि आंबेजोगाई येथे पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातील चाकूर, निलंगा, रेनापूर येथे मुसळधार पाऊस झाला. तर इतर मंडळांमध्ये हलक्या सरी पडल्या.

नांदेड, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातही ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली. हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत राज्यात ठिकठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा जारी केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com