Rain Update : सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप

जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले होते. परंतु, मंगळवारपासून (ता. १८) पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, पावसामुळे शेतात साचलेले पाणी अजूनही तसेच आहे.
Rain Update
Rain UpdateAgrowon

सांगली ः जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून परतीच्या पावसाने (Monsoon Rain) थैमान घातले होते. परंतु, मंगळवारपासून (ता. १८) पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, पावसामुळे शेतात साचलेले पाणी अजूनही तसेच आहे. त्यामुळे सोयाबीन पिकासह भुईमूग पिकांची काढणीस (Crop Damage) अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

Rain Update
Heavy Rain : चार जिल्ह्यातील दहा मंडळात अतिवृष्टी

जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या काढणीच्यावेळीच परतीच्या पावसाने हजेरी लावली. अनेक भागांत मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे काढणीला आलेली पिके शेतातच तशीस उभी आहेत. परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात अंदाजे १३०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. अर्थात या बाधित पिकामध्ये सोयाबीन पिकाचा सर्वाधिक समावेश असण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

जिल्ह्यात सलग आठ दिवस पडणारा पाऊस कालपासून थांबला आहे. आजही पावसाने उघडीप दिली असली तरी, अद्याप शेतात पाणी साचलेले आहे. त्यामुळे पिकांची काढणी करता येत नाही. पीक पाण्यात असल्याने सोयाबीन, भुईमूग पिकास कोंब फुटू लागले आहेत. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. हाता तोंडाशी आलेले पीक पावसामुळे बाधित झाले असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

पंचनामे कधी ?

तीन दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्या वेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी कृषी विभागाकडून नुकसान झालेल्या पिकांची माहिती घेतली. त्यानंतर तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अद्याप पंचनामे करण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेतला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पंचनामे कधी, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com