Rain Update : पाऊस ओसरण्याची चिन्हे

कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरण्याची चिन्हे आहेत.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. राज्यात सुरू असलेला पाऊस ओसरण्याची चिन्हे आहेत. आज (ता. १२) कोकण व मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Weather Update
Cotton Rate : कापूस दरातील तेजी परतणार?

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रातील ठळक कमी दाब क्षेत्रापासून उत्तर बंगाल उपसागरापर्यंत कायम आहे. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रापासून ते केरळ पर्यंत किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. मध्य प्रदेशात पूर्व-पश्चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोडक्षेत्र कायम आहे. पश्चिम बंगाल आणि परिसरावरही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Weather Update
Soybean: सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोग पडलाय का ?

मध्य प्रदेशातील कमी दाब क्षेत्र ओसरल्यानंतर, अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे. तर दक्षिणेकडे आलेला मॉन्सूनचा आस, किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पावसाने तडाखा दिला. आज (ता. १२) कोकणातील रायगड, रत्नागिरी. पुणे, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे.

अरबी समुद्रात ठळक कमी दाब क्षेत्र

सौराष्ट्र आणि लगतच्या अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र ठळक झाले आहे. पश्चिमेकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता उद्या (ता. १३) वाढण्याची शक्यता आहे. तर बंगालच्या उपसागरातही उद्यापर्यंत नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. मध्य प्रदेश आणि परिसरावरील कमी दाब क्षेत्र निवळून गेले आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com