धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला

‘गुंजवणी’च्या पाणलोट क्षेत्रात २२ मिलिमीटर पाऊस
धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला
Rain UpdateAgrowon

पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Watershed Area) पावसाचा जोर वाढला आहे. गुंजवणी धरणाच्या (Gunjavani Dam) पाणलोट क्षेत्रात २२ मिलिमीटर पाऊस (Rain) पडल्याची नोंद झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून होती. मात्र जोरदार पाऊस होत नसल्याने खरीप हंगामात संकटात येण्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून वातावरणात चांगलाच बदल झाला होता. अखेर सोमवारपासून (ता.२०) पावसास सुरुवात झाली असून, तुरळक ठिकाणी पाऊस पडला. पुणे शहर, मावळ, मुळशी, भोर, खेड, आंबेगाव, इंदापूर तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस पडला. या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. भात पट्ट्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आधार मिळत असल्याने भात रोपवाटिकेच्या कामांना वेग येईल.

भोरमधील गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानंतर मुळशी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडला. येथे १६ मिलिमीटर पाऊस पडला. तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १५ मिलिमीटर, कासारसाई १४, पानशेत १३, वरसगाव १३, पवना १२ मिलिमीटर पाऊस पडला. तर वडिवळे, आंध्रा, कळमोडी, खडकवासला, वडज, नीरा देवघर, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तुरळक सरी बरसल्या. तर वीर, भाटघर, नाझरे, पिंगळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, डिंभे, घोड, विसापूर, चिल्हेवाडी, चासकमान, भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस नसल्याचे चित्र आहे.

मंगळवारी (ता.२१) मंडळनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये :

हवेली - पुणे शहर २.५, केशवनगर १.३, खडकवासला ४.५, खेड ४, चिंचवड १.३

मुळशी - पौड १५.३, घोटावडे १५.५, थेरगाव ७.३, माले १८.०, मुठे १८.०, पिरंगूट ६.५

भोर - भोर ३.५, भोलावडे २, नसरापूर १४.५, किकवी ४.५, वेळू ३.५, आंबवडे २.३, संगमनेर १.८, निगुडघर २.८

मावळ - वडगाव मावळ ११, तळेगाव १०.३, काले ७.३, कार्ला १३.८, खडकाळा १३.८, लोणावळा १३.८, शिवणे ४.८

वेल्हा - वेल्हा १९, पाणशेत ९, विंझर १९, अंबवणे १५

जुन्नर - राजूर १, डिंगोरे १, आपटाळे १

खेड - चाकण १.५

आंबेगाव - आंबेगाव ९

इंदापूर - इंदापूर १.३, निमगाव ६.५, अंथुर्णी ८

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com