Weather Update : पावसाच्या उघडिपीची शक्यता

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याने राज्यात पाऊस काहीशी उघडीप देण्याची शक्यता आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : मॉन्सूनचा आस (Monsoon Axis) असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकण्याची शक्यता असल्याने राज्यात पाऊस (Maharashtra Rain Update) काहीशी उघडीप देण्याची शक्यता आहे. आज (ता. २८) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह (Cloudy Weather) हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निवळताच मॉन्सूनचा आस त्याच्या सर्वसाधारण स्थितीत पोहोचला आहे. बिकानेरपासून, ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेला मॉन्सूनचा आस दोन ते तीन दिवसांत उत्तरेकडे जाण्याचे संकेत आहेत. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून, त्यापासून रायलसीमापर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे.

Weather Update
Fertilizer Price Hike: खते महागल्यामुळे भात लागवड घटली?

राज्यात ढगाळ हवामान असून, ऊन सावल्यांचा लपंडाव सुरू आहे. काही ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने उन्हाचा चटका जाणवला. तर उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून आले. आज (ता. २८) पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात पाऊस उघडीप देण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.

Weather Update
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

विदर्भ : यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

नांदेडला पावसाचा तडाखा

राज्यात पावसाचा जोर कमी अधिक होत असून, कोठे ऊन, कोठे ढगाळ हवामानासह हलक्या सरी, तर कोठे मुसळधार सरी असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे. बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली. तर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने तडाखा दिला. हिमायतनगर येथे ८१ मिलिमीटर, किनवट येथे ७५ मिलिमीटर पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली. नद्या नाल्यांना पूर आल्याने पाणी इतरत्र पसरल्याने जनजीवन विस्कळित झाले. शेतामध्ये पाणी साचून पिकांना फटका बसणार आहे.

राज्यात बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण : मुंबई शहर : कुलाबा ३५. रायगड : पोलादपूर ४८, उरण २०. रत्नागिरी : दापोली ३४, हर्णे २७, खेड २८, मंडणगड २३, वाकवली २२. सिंधुदुर्ग : कुडाळ ३३, सावंतवाडी २९. ठाणे : मुरबाड २७, शहापूर ३१.

मध्य महाराष्ट्र : जळगाव : चाळीसगाव २०, धरणगाव २५, एरंडोल ३०, जळगाव ३५. नंदूरबार : अक्कलकुवा ४८.

मराठवाडा : औरंगाबाद : सिल्लोड २६, वैजापूर २३. जालना : आंबड २५. लातूर : जळकोट २०. नांदेड : अर्धापूर २७, भोकर ४८, धर्माबाद २९, हिमायतनगर ८१, किनवट ७५, मुदखेड ५४, नायगाव खैरगाव २३, उमरी ४०.

विदर्भ : भंडारा : लाखंदूर २३, मोहाडी ४२, तुमसर २५,

बुलडाणा : बुलडाणा २५. चंद्रपूर : चंद्रपूर २७, जेवती २०, कोर्पणा २२, राजापूर २९, सावळी २१. गडचिरोली : अहिरी २६, देसाईगंज २९, धानोरा २५, सिरोंचा २३. गोंदिया : देवरी २१, गोंदिया २३, गोरेगाव ३१, सालकेसा २९. नागपूर : हिंगणा २८, मौदा २६, नागपूर ३०, यवतमाळ : अर्णी ६४, दारव्हा २४, दिग्रस २०, मारेगाव २५, वणी २१.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com