राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज
राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Rain UpdateAgrowon

पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. कोकण किनारपट्टीसह राज्याच्या अनेक भागात ढग जमा (Cloudy Weather) झाले आहेत. आज (ता. २३) दक्षिण कोकणात जोरदार पावसाचा (Heavy Rain) ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert Of Rain) देण्यात आला आहे. उत्तर कोकण, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज (Rain Prediction) आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

राज्याच्या विविध भागात मॉन्सूनच्या पावसाला सुरूवात झाली आहे. बुधवारी (ता. २२) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी सुरू होत्या. आज (ता. २३) सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर कोकणातील ठाणे, पालघर मुंबई, रायगड, रत्नागिरी, विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर येथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात पाऊस वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दक्षिण महाराष्ट्रापासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. अरबी समुद्रातून मॉन्सूनचे प्रवाह वाढला आहे. किनारपट्टीय भागात ढगांची दाटी कायम आहे. वायव्य राजस्थानपासून पश्चिम बंगालपर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा सक्रिय आहे. राजस्थान आणि परिसरावर तसेच झारखंड आणि ओडिशा परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

कोकण : सिंधुदुर्ग.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

कोकण : ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी.

विदर्भ : यवतमाळ, चंद्रपूर

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com